World Cup 2023: मॅक्सवेलच्या द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; 91 धावांत 7 विकेट्स घेऊनही अफगाणिस्तानचा पराभव

ऑस्ट्रेलियाने 46.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं.

125
World Cup 2023: मॅक्सवेलच्या द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; 91 धावांत 7 विकेट्स घेऊनही अफगाणिस्तानचा पराभव
World Cup 2023: मॅक्सवेलच्या द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; 91 धावांत 7 विकेट्स घेऊनही अफगाणिस्तानचा पराभव

ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल (AUS vs AFG) याच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर अशक्य असा विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे, तर अफगाणिस्तानने जिंकलेला सामना गमावलाय. ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद द्विशतक ठोकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय झाला आहे.

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ग्लेन मॅक्सवेल याच्या द्विशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 46.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह नवव्यांदा वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे.

(हेही वाचा – Air Pollution: हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी सरकारकडून ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी)

त्याआधी अफगाणिनस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकडून इब्राहीम झद्रान याने सर्वाधिक 129 धावांची शतकी खेळी केली. राशिद खान यान नाबाद 35 धावा केल्या. रहमतने 30 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने 26 रन्स केल्या. अझमतुल्लाहने 22 तर गुरुबाजने 21 धावा जोडल्या. मोहम्मद नबीने 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने 2, तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झॅम्पा या तिघांनी 1-1 विकेट गेली.

पॅट आणि ग्लेन या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद २०२ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने विजयी षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं तसेच या सिक्ससह ग्लेनने द्विशतक पूर्ण केलं. ग्लेनने १२८ बॉलमध्ये २१ चौकार आणि १० सिक्ससह नाबाद २०० धावा केल्या, तर पॅटने ६८ बॉलमध्ये नॉट आऊट १२ रन्स केल्या.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
ऑस्ट्रेलियाची 292 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झाली. टॉपसह मिडल ऑर्डरमधील फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर फ्लॉप ठरले. दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला झटपट धक्के दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 18.3 ओव्हरमध्ये 7 बाद 91 अशी स्थिती झाली, मात्र त्यानंतर पॅट कमिन्स याच्या मदतीने ग्लेन मॅक्सवेल याने वन मॅन शो गेम बदलला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.