मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) मुंबईच्या दिशेने ढेकु गाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हायवे ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीमअंतर्गत गँन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानुसार बुधवार, ८ नोव्हेंबर दुपारी दोन ते अडीच या वेळेत गँन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी दोन ते अडीच दरम्यान अर्ध्या तासाचा वाहतूक ब्लॉक (Traffic Block) घेण्यात आला आहे.
त्यामुळे यावेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे, तर द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने ढेकू गाव येथेही बुधवारी अडीच ते तीन या वेळेत गँन्ट्री बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधी या मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद असणार आहे.
(हेही वाचा – Lifestyle : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरीच बनवा ‘हा’ पदार्थ, वाचा सोपी रेसिपी)
Join Our WhatsApp Community