Education Department: शालेय पोषण आहारात अंडी आणि केळ्याचा समावेश, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

शालेय पोषण आहाराच्या या नव्या मेनूचा उपक्रम २३ आठवड्यांकरिता सुरू राहणार आहे.

335
Education Department: शालेय पोषण आहारात अंडी आणि केळ्याचा समावेश, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
Education Department: शालेय पोषण आहारात अंडी आणि केळ्याचा समावेश, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात (‎Shaley Poshan Aahar Yojana) आता आठवड्यातून एकदा अंडी (Egg) आणि केळीचा (Banana) समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (Education Department) घेतला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेनुसार, विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार आहेत. या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येईल.

शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक पदार्थ देण्यात येणार आहेत. शालेय पोषण आहाराच्या या नव्या मेनूचा उपक्रम २३ आठवड्यांकरिता सुरू राहणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत दिली. शालेय विद्यार्थ्यांना आपण अधिकाधिक पौष्टिक आणि सकस आहार देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे केसरकर म्हणाले.

स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत प्रक्रिया…

सद्यस्थितीत अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी ५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत ही प्रक्रिया राबवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.