उत्तरप्रदेश एटीएसने अलीगढमधून इसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. (ISIS In India) आता दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे पथकही त्यांची चौकशी करणार आहे. दोन्ही आरोपी अलिगढ मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचे (SAMU) सदस्य आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अलीकडेच जामिया मिलिया इस्लामिया येथील पीएचडीचे विद्यार्थी अर्शद वारसी आणि पुोणे इसिस प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) वॉन्टेड दहशतवादी शाहनवाझ याला दिल्लीतून अटक केली होती. (ISIS In India)
ISISचे अखिल भारतीय मॉड्यूल
एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या 2 दहशतवाद्यांकडून अलीगढचे रहिवासी अब्दुल्ला अर्सलान आणि माज बिन तारिक यांच्याबद्दल माहिती मिळाली होती, असे सांगितले जात आहे. यानंतर उत्तरप्रदेश एटीएसने अलीगढ विद्यापिठीवर छापा टाकला आणि त्या दोघांना अटक केली. हे ISIS चे अखिल भारतीय मॉड्यूल आहे, ज्यामध्ये मुख्यतः उत्तर प्रदेश, झारखंड, पुणे येथील उच्चशिक्षित विद्यार्थी सहभागी आहेत. (ISIS In India)
रासायनिक हल्ल्याचा कट
एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केलेल्या शाहनवाझ आणि रिझवान यांच्यासमवेत हे आरोपी भयंकर रासायनिक हल्ल्याची योजना आखत होते. अब्दुल्ला अर्सलान याने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक केले आहे. त्याच वेळी इसिसच्या काही हँडलर्सनी पुणे मॉड्यूलमधून अब्दुल्ला अर्सलान आणि माज बिन तारिक यांच्याशी संपर्क साधला होता.
भारतात इसिसचे किती हँडलर आहेत ?
अलीगढ येथून अटक करण्यात आलेल्या अब्दुल अर्सलान आणि माज बिन तारिक या दोन संशयितांची महाराष्ट्र एटीएस आणि राजस्थान पोलिसांव्यतिरिक्त उत्तर प्रदेश एटीएस, तसेच दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जाईल. उत्तर प्रदेश एटीएसचा असा विश्वास आहे की, चौकशीदरम्यान त्यांना भारतात सक्रिय असलेल्या आयएसआयएसशी संबंधित इतर सदस्यांची माहिती देखील मिळू शकते. (ISIS In India)
पुणे मॉड्यूलची मुळे उत्तरप्रदेशातील सहा जिल्ह्यांमध्ये
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे इतर अनेक विद्यार्थीही उत्तर प्रदेश एटीएसच्या रडारवर आहेत, ज्यांनी दहशतवादी संघटना आयएसच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपी एटीएसनेही या प्रकरणात त्याचे नाव घेतले आहे. आयएसचे पुणे मॉड्यूल उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यांमध्ये खोलवर रुजलेले होते. अलीगढ व्यतिरिक्त या मॉड्यूलचे सदस्य संबळ, प्रयागराज, लखनौ, रामपूर, कौशांबी आणि इतर जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. ते एक मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी शस्त्रे आणि दारूगोळा जमवत आहेत. (ISIS In India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community