Prohibition Order in Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारात जमावबंदी; ‘हे’ आहे कारण

202
Prohibition Order in Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारात जमावबंदी; 'हे' आहे कारण

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Prohibition Order in Pune University) त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले होते. त्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

सात ते २१ नोव्हेंबर दरम्यान जमावबंदी लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश लागू केले आहेत. आदेशातून विद्यापिठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना वगळण्यात आले आहे. (Prohibition Order in Pune University)

(हेही वाचा – Supreme Court: पत्रकारांची उपकरणे जप्त करणे गंभीर, सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे सुचवण्यासाठी १ महिन्याचा कालावधी)

शांततामय वातावरणाची आवश्यकता

विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूरक असे सौहार्दपूर्ण, शांततामय वातावरणाची आवश्यकता असल्याने विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात निर्बंध घालणे आवश्‍यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. फौजदारी संहिता प्रक्रिया १९७३च्या कलम १४४ नुसार विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र येण्यास, विद्यापिठात प्रवेश करण्यास प्रतिबंध, विद्यापीठ परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. (Prohibition Order in Pune University)

गेल्या आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये ‘स्‍टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’, लोकायत अशा विविध संघटना १ नोव्‍हेंबर या दिवशी विद्यार्थ्‍यांची बळजोरीने सदस्‍यता नोंदणी करत होत्‍या. या वेळी काही विद्यार्थ्‍यांनी सदस्‍यता करण्‍यास नकार दिल्‍यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्‍या गुंडांनी विद्यार्थ्‍यांना मारहाण केल्‍याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. या मारहाणीमध्‍ये विद्यार्थी जबर जखमी झाले असून एका विद्यार्थ्‍याच्‍या कपाळावर मोठी जखम झाली होती. त्यानंतर विद्यापिठाने विविध पावले उचलली आहेत. (Prohibition Order in Pune University)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.