नाशिकसह विभागातील लाचखोरी सतत वाढत असून अहमदनगर येथील एक कोटी रुपयांचे लाच प्रकरण ताजे असतांनाच आता नाशिकमधून एक प्रकरण समोर आले आहे. (Bribary In Nashik) जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात 35 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदारासह एका युवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या पोलीस हवालादाराने एक लाख रुपयांची लाच मागत 70 हजार रुपये लाच घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली. नाशिकचे पोलीस अंमलदार रवींद्र बाळासाहेब मल्ले आणि मध्यस्थ तरुण मोहन तोंडी अशी संशयितांची नावे आहेत. (Bribary In Nashik)
पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले हे विल्होळी पोलीस चौकी येथे कर्तव्य बजावत होते. या ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात मल्ले याने तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने तक्रारीची शहानिशा करत सापळा रचला. तडजोड करत मल्ले याने 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे मान्य केले. (Bribary In Nashik)
पंचवटीतील हिरावाडी येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील संशयित तरुण तोडी याने तक्रारदाराकडून लाचेची 35 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली आणि एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात हवालदार मल्ले याच्यासह तरुण तोडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Bribary In Nashik)
नाशिक विभागात मागील आठवडाभरात लाचखोरीच्या विरोधात चार कारवाया करण्यात आल्या आहेत. पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे समोर आले आहे. नुकतेच एक कोटी रुपये लाच घेतल्याप्रकरणी साहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Bribary In Nashik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community