Maratha Reservation : अखेर आज भेट होणार; संभाजीनगरमध्ये हालचालींना वेग

132
Maratha Reservation : अखेर आज भेट होणार; संभाजीनगरमध्ये हालचालींना वेग
Maratha Reservation : अखेर आज भेट होणार; संभाजीनगरमध्ये हालचालींना वेग

८ नोव्हेंबरच्या सायंकाळी सरकारचे हे शिष्टमंडळ आज संध्याकाळी ५ वाजता जरांगेंची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. (Maratha Reservation) गेल्या दोन दिवसांपासून सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी हे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये येणार होते. काही कारणामुळे हा दौरा टळला होता. त्यावरून बरीच चर्चा चालू होती.

अखेर या शिष्टमंडळाचा दौरा ठरला असून आज संध्याकाळी ५ वाजता मनोज जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात हे शिष्टमंडळ पोहोचणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री अतुल सावे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि उदय सामंत यांचा समावेश असणार आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Crop Insurance : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने दिली खुशखबर)

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर गेल्याने शिष्टमंडळ संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून जरांगे यांना देण्यात आली होती. बुधवारी हे शिष्टमंडळ येणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यानुसार आज संध्याकाळी पाच वाजता सरकारचे हे शिष्टमंडळ संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचणार आहे. तेथून जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे.  (Maratha Reservation)

दरम्यान, माझी प्रकृती आता व्यवस्थित झाली आहे. मी पुढच्या दोन-तीन दिवसांत माझे काम पुन्हा सुरु करणार आहे. मराठा समाजासाठी सरकारकडून जोरदार काम सुरु आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्रे पडू लागली आहेत. जेव्हा नाराजी व्यक्त करायची होती, तेव्हा आम्ही ती व्यक्त केली; पण आज पूर्ण ताकदीने सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतं आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.