Aaditya L1: आदित्य L १बाबत आली मोठी अपडेट, इस्रो चे मोठे यश

109

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ चे यशस्वी प्रक्षेपण केले. यानंतर आता आदित्य एल १ ने अचूक कामगिरी केली आहे. भारताच्या आदित्य एल १ यानावरील हाय एनर्जी एल १ ऑर्बिटिंग एक्सरे स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने सौरज्वाळांची प्रथमच नोंद केली. (Aaditya L1)
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडल्यानंतर आदित्य एल १ यानाचा लॅग्रेंज पॉईंट १ (एल १) च्या दिशेने सध्या प्रवास सुरू आहे. सूर्याच्या दिशेने पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर असलेल्या एल १ या ठिकाणी पोहोचण्याआधी यानावरील विविध उपकरणांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. सौरज्वाळांमधून निघणाऱ्या उच्च ऊर्जेच्या एक्सरेच्या नोंदी घेणार आहे.

(हेही वाचा : Crop Insurance : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने दिली खुशखबर)

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल १ वरील एचईएल१ ओएस हे उपकरण सुरू करण्यात आले. हे उपकरण सौरज्वाळांमधून निघणाऱ्या उच्च ऊर्जेच्या एक्सरेच्या नोंदी घेणार आहे. एचईएल१ ओएस या उपकरणाने सूर्यावरून उसळलेल्या सी ६ या उच्च श्रेणीच्या ज्वाळेची नोंद घेतली. आदित्य एल १ वरील एचईएल १ ओएस उपकरणाने घेतलेल्या नोंदी आणि नासाच्या उपग्रहाने घेतलेल्या नोंदी तंतोतंत जुळल्या आहे, असे सांगितले जात आहे. एचईएल१ओएस हे उपकरण ‘इस्रो’च्या यूआर राव सॅटेलाइट सेंटरने विकसित केले आहे.दरम्यान, इस्रो संस्थेने आता नव्या मिशनवर काम सुरू केले आहे. चंद्र, सूर्यानंतर ISRO आता मंगळ ग्रहाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ISRO ने तयारी सुरु केली आहे. २०२४ मध्ये इस्रो मंगळयान-२ मिशन लॉन्च करणार आहे. NASA ला ज्यामध्ये यश मिळालेले नाही, ती रहस्य उलगडण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. मात्र, तत्पूर्वी इस्रोचे सर्व लक्ष मिशन गगनयानवर आहे. भारताची ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.