Virat Kohli on Maxwell : ‘हे फक्त तूच करू शकतोस’ असं विराट मॅक्सवेलला का म्हणाला?

ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेलच्या २०१ नाबाद धावांचं गारुड क्रिकेट विश्वावरून अजून गेलेलं नाही. त्याचं अभिनंदन करणारा नवा खेळाडू आहे किंग कोहली. आयपीएलमध्ये एकत्र खेळलेल्या आपल्या साथीदाराला वेगळ्याच अंदाजात विराटने शुभेच्छा दिल्या.

139
Virat Kohli on Maxwell : ‘हे फक्त तूच करू शकतोस’ असं विराट मॅक्सवेलला का म्हणाला?
Virat Kohli on Maxwell : ‘हे फक्त तूच करू शकतोस’ असं विराट मॅक्सवेलला का म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेलच्या २०१ नाबाद धावांचं गारुड क्रिकेट विश्वावरून अजून गेलेलं नाही. त्याचं अभिनंदन करणारा नवा खेळाडू आहे किंग कोहली. आयपीएलमध्ये एकत्र खेळलेल्या आपल्या साथीदाराला वेगळ्याच अंदाजात विराटने शुभेच्छा दिल्या. (Virat Kohli on Maxwell)

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर त्याच्या १२८ चेंडूंत २०१ धावांच्या खेळीनंतर कौतुकाचा वर्षाव होतोय. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला एकहाती हा सामना जिंकून दिला आणि उपांत्य फेरीचे दरवाजेही संघासाठी उघडे केले. संघाची अवस्था ७ बाद ९१ असताना आणि खेळीदरम्यान पाय दुखावल्यावरही नेटाने फलंदाजी करत मॅक्सवेलने धुवाधार द्विशतक झळकावलं. (Virat Kohli on Maxwell)

कालपासून त्याला सगळ्याच दिग्गज खेळाडूंकडून शाबासकी मिळते आहे. आता क्रिकेटमधला सध्याचा किंग अर्थात, विराट कोहलीने मॅक्सवेलला विशेष संदेश लिहून त्याचं कौतुक केलं आहे. दोघं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून एकत्र खेळतात. त्यामुळे आयपीएलच्या हंगामात त्यांनी एकाच ड्रेसिंग रुममध्ये वेळ घालवलाय. (Virat Kohli on Maxwell)

आता मॅक्सवेलचं कौतुक करताना कोहली आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हणतो, ‘फक्त तूच हे करू शकतोस, मॅक्सी!’ (Virat Kohli on Maxwell)

New Project 92 2

सगळ्यांच्या शुभेच्छा बरसत असताना ग्लेन मॅक्सवेलनेही मग बुधवारी सकाळी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे सद्गदित झालो आहे. सगळ्यांचे आभार. पॅट कमिन्सची चांगली साथ मला मैदानावर मिळाली. आता मी पालकाच्या भूमिकेत शिरलो आहे. त्यामुळे उत्तर द्यायला वेळ लागला,’ असं मॅक्सवेलने म्हटलं आहे. (Virat Kohli on Maxwell)

(हेही वाचा – Drought : राज्याला दुष्काळाच्या झळा; टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी गावांच्या संख्येत वाढ )

मॅक्सवेलला मैदानात काल दोन जीवदानं मिळाली. यातील एकदा तो अर्धशतकाजवळही पोहोचला नव्हता. तर एकदा पायचीतचं जोरदार अपील तिसऱ्या पंचांनी फेटाळून लावलं. या दोन जीवदानांमुळे द्विशतक शक्य झाल्याचं मॅक्सवेलने पुन्हा एकदा नमूद केलं आहे. तर संघाचे हौसले आता बुलंद आहेत आणि पुढील आव्हानासाठी संघ सज्ज आहे, असंही त्याने म्हटलंय. (Virat Kohli on Maxwell)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.