यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम चिखले ब्रिज येथे गुरुवारी (९ नोव्हेंबर )११ ते ५ वाजेपर्यंत केले जाणार आहे. यादरम्यान सर्व प्रकारची वाहने, हलकी व जड-अवजड वाहने यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. (Mumbai Pune Express way)
हे आहेत पर्यायी मार्ग
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने मुंबई लेन पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावर करंजाडेमार्गे कळंबोली अशी वळविण्यात येतील.
- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडून मुंबईला येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करण्यात येतील.
(हेही वाचा : Central Railway Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे अर्धा तास उशिरा)
Join Our WhatsApp Community