Firecrackers Stock Seized : सावरकर मंडईसह दादरमधून लाखो रुपयांच्या फटाक्यांचा साठा जप्त

मुंबईत फटाक्यांची विक्री ही रितसर परवानगी घेऊन न केल्यास अनधिकृतपणे फटाक्यांची विक्री करणाऱ्यां विरोधात महापालिकेच्या परवाना विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात येते.

203
Firecrackers Stock Seized : सावरकर मंडईसह दादरमधून लाखो रुपयांच्या फटाक्यांचा साठा जप्त
Firecrackers Stock Seized : सावरकर मंडईसह दादरमधून लाखो रुपयांच्या फटाक्यांचा साठा जप्त

मुंबईत फटाक्यांची विक्री ही रितसर परवानगी घेऊन न केल्यास अनधिकृतपणे फटाक्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या परवाना विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात येते. त्यानुसार दादरमध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांचा माल दादर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईमध्ये साठा करून ठेवल्याची माहिती प्राप्त झाल्यांनतर या पथकाने सकाळी यावर कारवाई केली. यासह काही फटाक्यांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून तब्बल ६७३ किलो फटाक्यांचा पॅकिंगचा माल जी उत्तर विभागाच्या परवाना विभागाच्या वतीने जप्त करण्यात आला. (Firecrackers Stock Seized)

दादर पश्चिम येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक फटाक्यांच्या विक्रीची दुकाने स्थापण्यात आली असून दादर रेल्वे स्थानका जवळ तसेच डिसिल्व्हा मार्गावर सर्वांधिक फटाक्यांच्या विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यासर्व फेरीवाल्यांना पुरवण्यात येणारा माल हा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईतील एका गाळ्यात साठा करून ठेवला असल्याची माहिती या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी भेट दिली. त्यानंतर या गाळ्यातील ज्वलनशील वस्तू असलेल्या या फटाक्यांच्या साठ्या संदर्भात परवानगीबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे याबाबत कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले. यासह दादर भागातील अन्य फटाके विक्रेत्यांकडील माल पॅकिंगसह सामान जप्त करण्यात आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दादरमध्ये ६६७ किलो आणि धारावीमध्ये ०६ अशाप्रकारे एकूण १९ फेरीवाल्यांकडून ६७३ किलोचा फटाक्यांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Firecrackers Stock Seized)

(हेही वाचा – Samajwadi Party VS Congress : उत्तरप्रदेशात कॉंग्रेस विरुद्ध सपा; ‘इंडी’ आघाडीचा होणार खेळ खंडोबा)

सावरकर मंडईमध्ये अत्यंत दाटीवाटीने गाळे असून जर या साठ्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. दहा ते पंधर वर्षांपूर्वी डिसिल्व्हा रोडवर अशाचप्रकारे फटाक्याच्या दुकानामुळे आगीची दुर्घटना घडली होती आणि या आगीमध्ये अनेक दुकाने जळून खाक झाली. पूर्वीच्या छाया हॉटेलपासून ते विसावा हॉटेल, मस्जिदपर्यंत ही आग पसरली होती. त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या परवाना विभाग व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई करून एकप्रकारे या मंडईतील संभाव्य दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सावरकर मंडईमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात फटाक्याचा साठा करून ठेवलेला असताना तिथे असलेल्या बाजार निरिक्षकांना याची कल्पनाच नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Firecrackers Stock Seized)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.