Winter Season : थंडीत फाटलेल्या ओठांसाठी रामबाण उपाय

149

काही लोकांना तूप खायला आवडत नाही किंवा त्याचा वास देखील आवडत नाही, पण जर तुम्ही त्याचे फायदे वाचलेत तर तुम्ही अवश्य तूप खाल. परंतु, या लेखात आम्ही तुम्हाला तूप खाण्यासाठी प्रोत्साहन नाही देणार, तर ओठांवर तूप लावण्याचे फायदे  सांगणार आहोत. ओठांवर तूप लेण्याचे बरेच फायदे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत.

हळद आणि तुपाचे मिश्रण आहे गुणकारी :

एक नैसर्गिक उपाय, कोमल ओठांसाठीचा म्हणजे हळद आणि तूप. एक चमचा तूप आणि चिमूटभर हळद घ्या, दोन्हीचे एकसमान मिश्रण तयार करा आणि मग ओठांवर लावा. तूप हे ओठांचा मोइस्तूराइझ करत आणि हळद त्वचेवर उपचार करते. हे लेप रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी काढून टाका. तुम्ही हे मिश्रण एका छोट्या बाटल मध्ये तयार करून ठेवू शकता आणि हवा तेव्हा वापरू शकता.

त्वचेचे तेज वाढवते :

दररोज तूप वापरल्याने, ओठ गुलाबी रहातात. हळदीमुळे त्वचा काळी पडत नाही उलट अझून उजळते. स्किन आणि लीप केर प्रॉडक्टमुळे सहसा त्वचा काळी पडते. जर तुमचे ओठ काळे पडले असतील, तर हे मिश्रण तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

(हेही वाचा Samajwadi Party VS Congress : राजस्थानात कॉंग्रेस विरुद्ध सपा; ‘इंडी’ आघाडीचा होणार खेळ खंडोबा)

लिप बाम किंवा पेट्रोलियम जेलीचा नियमित वापर :

थंडीच्या वेळी आणि विशेषत: थंड हवेत ओठांवर वारंवार लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावण्यास अजिबात संकोच करू नका. तसेच फेस मास्क वापरू शकता. हे आपले ओठ तसेच तोंडाभोवतीचे क्षेत्र व्यापते. आणि कोरड्या हवेचा परिणामही जाणवणार नाही.

तुपाऐवजी मध देखील तितकेच फायद्याचे :

जर आपल्याला तूपची चव किंवा सुगंध अजिबातच आवडत नसेल आणि आपण ते सहन करण्याच्या मूडमध्ये नसल्यास आपण थोडावेळ ओठांवर मध देखील लावून ठेवू शकता. त्यासाठी मधात चिमूटभर हळद घालून ओठांवर लावा. कमीतकमी 15 ते 20 मिनिटे सोडा, नंतर ते धुवा आणि आवश्यक असल्यास लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावा. ओठ साफ करताना ओठांवरील मृत त्वचा काढून टाकणे सुलभ करण्यासाठी कापसाचा वापरा. हे आपल्या ओठांना देशी तुपाच्या प्रभावाप्रमाणे मऊ आणि सुंदर बनवेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.