Healthy Tips : ‘हे ‘आहेत भिजवलेल्या शेंगदाण्याचे फायदे

189

प्रत्येकाचे मॉर्निंग रूटीन हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. कुणाला सकाळची सुरूवात ही भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊन करायला आवडते, तर कुणाला मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलेड खायला आवडते. हेल्दी ड्रिंक्स, फळे किंवा ग्रीन टीने काहींची सकाळ होते. (Healthy Tips)
शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो. स्वयंपाक घरात अनेक भाज्यांमध्ये, विविध प्रकारच्या रेसिपीजमध्ये शेंगदाण्यांचा वापर आपण करतो. इतकचं काय, शेंगदाण्याचे लाडू देखील बनवले जातात.परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. चला मग जाणुन घ्या काय आहेत फायदे

गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळतो आराम
शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, मॅंगनिज, कॉपर, कॅल्शिअम आणि सेलेनियम सारखे घटक आढळून येतात. त्यामुळे, रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळण्यास मदत होते.त्यामुळे, ज्या लोकांना गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्येचा नेहमी त्रास होतो, अशा लोकांनी आवर्जून रात्री झोपताना १०-१२ शेंगदाणे पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी या शेंगदाण्यांचे सेवन करावे.

खोकल्यामध्ये फायदेशीर
हो तुम्ही वाचलं ते खरं आहे. भिजवलेले शेंगदाणे रिकाम्या पोटी खाल्ल्यावर तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळू शकतो. तसेच, तुमचे खोकल्याचे इंन्फेक्शन देखील यामुळे थांबू शकते.भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे, आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.