शंकर नाग यांचं खरं नाव शंकर नागरकट्टे असं आहे. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५४ रोजी कर्नाटकात झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी मराठी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. नंतर ते पुन्हा कर्नाटकात गेले. त्यानंतर त्यांनी गिरीश कर्नाड यांच्या ओन्दुओंदू कालादल्ली या चित्रपटात सैनिकाची भूमिका केली. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नंतर त्यांनी केवळ १२ वर्षातच म्हणजे १९७८ ते १९९० दरम्यान सुमारे ९० कन्नड चित्रपटांतून अभिनय केला. त्यांचे भाऊ अनंत नाग हे कन्नड चित्रपटातील मोठे अभिनेते आहेत. (Shankar Nag)
शंकर नाग यांचा लूक पारंपारिक कन्नड सिनेमांसाठी अतिशय योग्य आहे असा समज अनेक निर्मात्यांनी करुन घेतला होता. त्यांनी अनेक मसाला चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांचे भाऊ अनंत नाग यांच्यासोबत त्यांनी ’मिंचिना ओटा’ आणि जन्म जन्मदा अनुबंध;, गीता अशा चित्रपटांमधून सह-निर्माता आणि दिग्दर्शनाची भूमिका देखील निभावली आहे.
गंमत म्हणजे त्यांनी चित्रपटांतून अनेक फायटिंग सीन्स दिले आहेत. त्यांना ’कराटे किंग’ म्हटलं जायचं. मात्र त्यांनी कधी या विद्येचे प्रशिक्षण घेतले नव्हते. ऑटो राजा, गीता, मिंचिता ओटा असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. मिन्चिना ओटा, जन्म जन्मदा अनुबंध, गीता, नोडी स्वामी नाविरोडू हिगे, लालच, ऐक्सिडेंट, स्वामी (टीव्ही मालिका), ओंडू मुत्तिना कथे, मालगुडी डेज (टीव्ही मालिका) , होसा टीर्पू अशा चित्रपटांचे आणि मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
याशिवाय त्यांनी अनेक नाटकांमधूनही काम केले आहे. तसेच मालगुडी डेज या गाजलेल्या मालिकेतून त्यांनी अभिनय केला आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी कन्नड सिनेसृष्टीला महत्वाचे स्थान प्राप्त करुन दिले होते. मात्र ३० सप्टेंबर १९९० मध्ये त्यांच्या कारला अपघात झाला आणि त्यांचा कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही प्रवास संपुष्टात आला. कन्नड चित्रपटांना त्यांची कमतरता नेहमीच जाणवत राहिली आहे.
(हेही वाचा : गुरु-शिष्य परंपरा जपणारे सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक Pandit Chitresh Das)
Join Our WhatsApp Community