मणिलाल एच. पटेल यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९४९ रोजी गुजरातमधील लुनावडा येथे झाला. त्यांचे माता-पिता अंबाबेन आणि हरीदास हे शेतकरी होते. त्यांना पाच भावंडे होती. चौथी कक्षा पर्यंत त्यांचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर माधवास येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतले. १९६७ मध्ये त्यांची एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे १९७१ मध्ये त्यांनी गुजराती आणि इंग्रजीमध्ये बी.ए केले आणि १९७३ मध्ये संस्कृत आणि गुजरातीमधून एम.ए. केले. ’अर्वाचीन गुजराती कवितामा प्राणायनिरुपण’ या विषयात त्यांनी पी.एच.डी. केली. (Manilal H. Patel)
त्यांनी वडगाम आणि माधवासमधील शाळांमध्ये शिकवायला सुरुवात केली. ते १९७३ ते १९८७ मध्ये आर्ट्स ऍंड कॉमर्स कॉलेजमध्ये गुजराती शिकवत होते. १९८७ मध्ये त्यांनी सरदार पटेल युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. पुढे ते प्राध्यापक आणि विभागाचे प्रमुख झाले. २०१२ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. ते वल्लभ विद्यानगर राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गोपी आणि दोन मुलं राहतात.
तारासघर, घेरो, किल्लो, अंधारू, ललिता, अंजल, रातवासो हे त्यांनी लिहिलेले कथासंग्रह आहेत. मणिलाल एच. पटेलनी वार्तासृष्टी हा कथासंग्रह सुद्धा त्यांच्या नावावर आहे. पद्म विनाना देशमा, सातमी ऋतु, डुंगर कोरी घर कार्य, पतझर, विच्छेद, माती आणे मेघ हे त्यांचे कवितासंग्रह आहेत.
गुजराती साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी पटेल यांना २००७ मध्ये धनजी कानजी गांधी सुवर्ण चंद्रक साहित्य पदक प्रदान करण्यात आले होते. त्यांना अमरेलीचा मुद्रा चंद्रक मिळाला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांसाठी कोलकाता येथील साहित्य सेतू पुरस्कार मिळाला आहे.
त्यांना गुजरात साहित्य अकादमीकडून त्यांच्या कार्यासाठी पुरस्कारही मिळाला होता. गुजराती साहित्य परिषदेकडून त्यांना रातवासोसाठी उमा-स्नेहरश्मी पारितोषिक मिळाले आहे आणि डुंगर कोरी घर यासाठी उष्णास पारितोषिक प्रदान करण्यात आले. पटेल यांना उपेंद्र पंड्या पुरस्कार, काका साहेब कालेलकर पुरस्कार, नानाभाई सुरती पुरस्कार, हरिलाल देसाई पुरस्कार आणि जोसेफ मॅकवान पुरस्कार देखील मिळाले आहेत.
(हेही वाचा : Shankar Nag : मालगुडी डेजमध्ये काम केलेल्या हरहुन्नरी ’शंकर नाग’ यांना तुम्ही ओळखता का?)
Join Our WhatsApp Community