राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Crisis) अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली. अजित पवार शिवसेना, आणि भाजपसोबत एकत्र येत सत्तेत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. आज याच प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आधी शिवसेना कुणाची यावर घमासान झालं. आता राष्ट्रवादी (NCP Crisis) नेमकी कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगात होणार आहे. २ जुलैला अजित पवार गटानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या लढाईसाठी ६ ऑक्टोबर ही पहिली तारीख देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP Crisis) संघर्षाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात आज म्हणजेच गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मागील महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता.
(हेही वाचा – Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यातील पांगरा गावात भूकंपाचा धक्का)
तर, सुनावणी लवकर संपविण्यासाठी घाई करीत असल्याबद्दल आयोगाने अजित पवार (NCP Crisis) गटाला चांगलेच फटकारले होते.
अजित पवार गटाने ‘राष्ट्रवादी’वर (NCP Crisis) आपला हक्क सांगताना पी. ए. संगमा, सादिक अली या दोन प्रकरणांसह शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचा हवाला दिला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community