ऋजुता लुकतुके
मागच्या रविवारी दक्षिण आफ्रिकेबरोबरचा (Ind vs Ned) सामना खेळल्यानंतर भारतीय संघ मंगळवारी उशिरा बंगळुरूत दाखल झाला होता. इथं चिन्नास्वामी स्टेडिअमवर संघाचा शेवटचा साखळी सामना नेदरलँड्सबरोबर होणार आहे. मंगळवारच्या प्रवासाचा शिणवटा असल्यामुळे बुधवारी खेळाडूंसाठीचं नेट्स वैकल्पिक होतं.
विराट कोहली, सुर्यकुमार यादव, महम्मद शामी आणि कुलदीप यादव यांनी हॉटेलमध्ये विश्रांती घेणं पसंत केलं. तर नेट्समध्ये फलंदाजांनी सराव केला तो बुमराहचे आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्याचा. आणि विशेष म्हणजे बहुतेक जणांना ते खेळणं कठीण जात होतं.
ईशान किशन सगळ्यात आधी अशाच एका चेंडूचा शिकार झाला. बुमराहचा वर उसळलेला एक चेंडू त्याच्या पोटात बसला. काही मिनिटं आराम केल्यानंतर मग ईशान पुन्हा नेट्समध्ये आला. तर एरवी उंच फटके मारण्याचा सराव करणारा शुभमन गिलही बुमराहला जपून खेळत होता.
First practice session for the Indian team at the M. Chinnaswamy Stadium. India takes on Netherlands on Nov 12. pic.twitter.com/pzNz4vaiEI
— Ashwin Achal (@AshwinAchal) November 8, 2023
दुसरीकडे बुमराह मात्र आपल्या भात्यातील सगळी शस्त्रं आजमावत होता. त्याने सलग २० मिनिटं नेट्समध्ये गोलंदाजी केली. आणि पूर्ण दोन तास तो वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजीवर मेहनत घेत होता. या विश्वचषकात आतापर्यंत बळी मिळवण्याच्या बाबतीत महम्मद शामी (१६) तर महम्मद सिराज (९) आघाडीवर आहेत. पण, बुमराह गोलंदाजीची सुरुवात करताना महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
(हेही वाचा-NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे लक्ष)
बुमराहकडे आहे अचूकता. त्याने या विश्वचषकातही संघांकडून धावसंख्येचे मोठे डोंगर रचले जात असताना ३.६५ इतक्याच धावा षटकामागे दिल्या आहेत. आणि त्यामाध्यमातून प्रतिस्पर्धा फलंदाजांवर दडपण सतत वाढवलं आहे. आताही नेट्समध्ये गोलंदाजी करताना त्याचा प्रभाव दिसला. पहिल्या १० षटकांमध्ये तर बुमराहने २.९ इतक्याच धावा षटकांमागे दिल्या आहेत.
बुमराह शिवाय रोहित शर्मा, ईशान किशन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांनीही नेट्समध्ये सराव केला.
KL Rahul and Shreyas Iyer enjoying free time. pic.twitter.com/QUAD1YKpbF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023
नेट्सपूर्वी श्रेयस अय्यरने के एल राहुलबरोबर पूलमध्येही वेळ घालवला. पण, नेट्समध्ये फलंदाजीला उतरल्यावर त्याच्या खेळात चांगलं टायमिंग दिसत होतं. लागोपाठ दोन अर्धशतकांनंतर त्याचा आत्मविश्वास परत आलेला दिसतोय. तर कर्णधार रोहित शर्मानेही फलंदाजी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंगळुरूच्या चिन्नास्वामीचं मैदान तुलनेनं छोटं आहे. त्यामुळे सगळ्याच फलंदाजांनी षटकार किंवा उंच फटका खेळण्याचा सराव केला. बुमराहनेही आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सराव केला तो याचसाठी. डच फलंदाजांसमोर त्याचे चेंडू खेळण्याचं आव्हान असणार आहे.
हेही पहा-