Pune Crime : पुणे शहरात थरार, सराफावर गोळ्या झाडून दागिने लुटले

136
Pune : नौशादच्या गैरकृत्याची विद्यार्थ्यांना नाहक शिक्षा
Pune : नौशादच्या गैरकृत्याची विद्यार्थ्यांना नाहक शिक्षा

बुधवारी (८ नोव्हेंबर) रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या (Pune Crime) सराफावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेत सराफ व्यावसायिक प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडत त्यांच्याकडून सोने चांदीची बॅग पळवून नेली. त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.

पुण्यातील (Pune Crime) वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीटी कवडे रोडवर ही घटना घडली.

(हेही वाचा – ICC ODI Ranking : महम्मद सिराजचा आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकापर्यंतचा प्रवास )

अधिक माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्याच्या (Pune Crime) हद्दीतील बीटी कवडे रोडवरून जाणार्‍या दुचाकीस्वारावर गोळीबार झाला आहे. त्याच्या पायावर गोळया झाडण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्यासह वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

वानवडीतील बीटी कवडे रोडवर गोळीबार झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.