गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, मुंबई, पुणेसह कोलकाता शहराची (Air Pollution) हवा बिघडली आहे. अशातच आता मुंबई महापालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी एक नियमावली जाहीर केली आहे. त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तर दिवाळीतल्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात आणखी भर पडेल, अशी भीती व्यक्त करतानाच पुढील दोन दिवस मुंबईची हवा वायू प्रदूषणाच्या (Air Pollution) मध्यम श्रेणीत नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
(हेही वाचा – Delhi Artificial Rain : दिल्ली मध्ये प्रदूषणाला रोखण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणार?)
हवामान खात्याकडून (Air Pollution) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यानुसार कार्यवाहीही सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे वायू प्रदूषण मध्यम ते खराब या श्रेणीत नोंदविले जात आहे. पुढील दोन दिवस वातावरणात फार काही फरक पडणार नाही, असे मत मुंबई प्रादेशिक (Air Pollution) हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.
बुधवारची (८ नोव्हेंबर) प्रदूषणाची पातळी
भांडुप – ११०
मालाड – १२१
माझगाव – १४८
बोरिवली – १५६
बीकेसी – १४३
चेंबूर – १३०
अंधेरी – १११
नवी मुंबई – १२८
कुलाबा – ९२
वरळी – ७३
हेही पहा –
Join Our WhatsApp Community