Air pollution: वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सक्रिय; आढावा बैठक घेवून दिले निर्देश

132
Maratha-OBC Reservation : "दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका" - मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दिली समज

राज्यातील वायू प्रदूषणाबाबत (Air pollution) बैठक घेण्यात आली. राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. हवामान बदल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचरी या वेळी उपस्थित होते.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय?

  • प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे.
  • बांधकाम साईटवर smog गन स्प्रिंकलर बसवा
  • MMRDA च्या बांधकाम साईट धुळमुक्त करा
  • अर्बन फॉरेस्टवर भर द्या
  • मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी
  • वॉटर टँकरची संख्या वाढवावी
  • मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुणार
  • विविध बांधकाम साईट वर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत.
  • त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

दोन दिवसांआधी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबई आणि आजूबाजूच्या पालिका आयुक्तांची बैठक पार पडली होती, ज्यात आयुक्तांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते.

(हेही वाचा Nitish Kumar : नितीश कुमार यांचे आक्षेपार्ह कृत्य; श्रद्धांजलीसाठीची फुले उधळली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.