Swapna Patkar : पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदारांना पत्र पाठवून धमकी, गुन्हा दाखल

कथित पत्राचाळ घोटाळा संबंधित साक्षीदारांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

110
Swapna Patkar : पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदारांना पत्र पाठवून धमकी, गुन्हा दाखल
Swapna Patkar : पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदारांना पत्र पाठवून धमकी, गुन्हा दाखल

कथित पत्राचाळ घोटाळा संबंधित साक्षीदारांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. स्वप्ना पाटकर या पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार आहेत, काचेच्या बॉटलमध्ये धमकीची चिठ्ठी टाकून पाटकर यांच्या घराबाहेर बॉटल फेकण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पत्राचाळ प्रकरण ईडीकडे असून या प्रकरणात शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांना अटक झाली होती. (Swapna Patkar)

वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिना परिसरातील पाटकर यांच्या बंगल्यात पहाटे एकच्या सुमारास बाटली फेकण्यात आली. त्यांनी अंगरक्षक आणि इतर कर्मचार्‍यांकडे चौकशी केली तेव्हा तिला एक पत्र असल्याचे सांगण्यात आले. पाटकर यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली आणि पोलीस पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. (Swapna Patkar)

(हेही वाचा – Air pollution: वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सक्रिय; आढावा बैठक घेवून दिले निर्देश)

“तू खूप फडफडला आहेस. तुला कोण वाचवणार? कोर्टात आवाज काढू नकोस, मोठी नावं घेऊ नकोस. तुझं काम, बँक खाते आणि आयुष्य ब्लॉक होऊनही तू तुझा अहंकार सोडला नाहीस, असे मराठीत पत्रात लिहिलेले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. (Swapna Patkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.