Deepfake हा शब्द काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशाला कळला आहे. (Deepfake Video) कारण होते, अभिनेत्री रश्मिका मंदानाचा व्हायरल झालेला डीपफेक व्हिडिओ. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर अनेकांना प्रश्न पडला की, रश्मिका मंदानाचा असा व्हिडिओ बाहेर कसा येऊ शकतो. ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक लोक तिचे चाहते आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेक चाहते नाराज झाले. त्यानंतर रश्मिकाने या गोष्टीचा निषेध केला आणि हा खोटा व्हिडिओ असल्याचे जाहीर केले. तेव्हाच डीपफेक हा शब्द सोशल मीडियावर फिरू लागला.
Deepfake – डीपफेक म्हणजे काय ?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, डीपफेक या शब्दाचा काय अर्थ आहे ? आज AI तंत्रज्ञानाचा वापर करून खर्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करता येते. कोणाचेही फोटो, व्हिडिओशी छेडछाड करता येते. आर्टिफिशियल इंटलिजेन्स हे जसं वरदान आहे, त्याच प्रकारे हे शापदेखील ठरत आहे. कारण तंत्रज्ञान किंवा हत्यार वाईट नसून ते कुणाच्या हाती लागतं, त्यानुसार ते चांगलं अथवा वाईट ठरतं. असा एखादा फोटो किंवा व्हिडिओ जो खोटा आहे, बदलला गेला आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या आधारे तो खरा वाटतो. यालाच डीपफेक म्हटले जाते. (Deepfake Video)
(हेही वाचा – Cyber Helpline : ‘१९३०’ सायबर हेल्पलाईनला बळ, कर्मचारी आणि सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी)
सायबर क्राईम
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि त्याच्याशी संबंधित नियमांमध्ये अनधिकृत प्रवेश, डेटाची चोरी आणि धमकी देणे इत्यादी गोष्टी सायबर गुन्ह्यांतर्गत येतात. तुमच्या बाबतीत असा गुन्हा घडला, तर तुम्ही सायबर पोलिसात तक्रार करू शकता. तुमच्या डेटाची सुरक्षा हा तुमचा अधिकार आहे. महिलांविरोधातील सायबर क्राईमबद्दल पोलीस सतर्क आणि कठोर झाले आहेत. (Deepfake Video)
मानहानीचा दावा
तुम्हाला मानहानीचा दावा करण्याचा अधिकार आहे. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत मानहानीच्या तरतूदी समाविष्ट आहेत. जर कुणी खोटी माहिती पसरवून एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्याचा प्रयत्न केला, तर हा कायदा लागू होतो. मात्र डीपफेक व्हिडिओच्या बाबतीत प्रत्येक वेळी हा कायदा लागू होणार नाही. त्यासाठी चांगल्या वकिलाचा सल्ला घेणे कधीही श्रेयस्कर ठरेल. काही प्रकरणांत तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकेल.
गोपनीयतेचा अधिकार
प्रत्येक व्यक्तीकडे गोपनीयतेचा अधिकार असतो. मात्र आजच्या सोशल मीडियाच्या युगात काहीच गोपनीय राहिलेलं नाही. लोकांचं वैयक्तिक जीवन उघड्यावर पडलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान २००० आणि त्यातील नियमांद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीयतेसाठी विशिष्ट संरक्षण प्रदान केले जातात. यामध्ये तुमच्या डेटाच्या गोपनीयतेचा अधिकार सुद्धा दिला जातो. याद्वारे तुम्ही नक्कीच पोलिसात तक्रार नोंदवू शकता. जर संबंधित व्यक्ती दोषी आढळली, तर १ लाख रुपये दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. (Deepfake Video)
आपण घ्यायवाची काळजी
आपल्याला कायद्याद्वारे संरक्षण मिळणारच आहे. मात्र प्रत्येक वेळी गुन्हेगार पकडला जाईल किंवा तो दोषी ठरेल, असे ठामपणे सांगता येत नाही. असे प्रकार करणारे अत्यंत शातीर बुद्धीचे असतात. त्यामुळे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. आपले अगदी वैयक्तिक फोटो अथवा व्हिडिओ आपण शेअर करु नये. हे AI चं युग आहे. तुमचे फोटो किंवा व्हिडिओ मॅनिप्युलेट होण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. तसेच तुमचे वैयक्तिक आयुष्य मग सेक्स, भांडण इत्यादी गोष्टींचा सोशल मीडियावर उल्लेख करणे टाळले पाहिजे. या गोष्टी अत्यंत वैयक्तिक व भावनिक असतात. त्याचा बाजार मांडू नका. अशी काही पथ्ये पाळल्यास आपण सायबर गुन्ह्यापासून स्वतःचं संरक्षण करु शकतो. (Deepfake Video)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community