-
ऋजुता लुकतुके
येत्या रविवारी १२ नोव्हेंबरला भारत आणि नेदरलँड्सचे संघ बंगळुरूमध्ये आमने सामने येतील. गुणतालिकेतील अव्वल संघ वि. गुणतालिकेतील तळाचा संघ अशी ही लढत असेल. पण, अव्वल संघाशी दोन हात करताना डच संघाचे हौसले बुलंद आहेत. (Ind vs Ned)
या स्पर्धेत आतापर्यंत नेदरलँड्सच्या संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला धूळ चारली आहे. रविवारी भारताविरुद्ध त्यांच्याकडून परत अशा धक्क्याची अपेक्षा नाही. कारण, भारतीय संघ सध्या कमालीचा जमून आलेला संघ आहे आणि फारशा चुका त्यांच्याकडून होत नाहीएत. पण, नेदरलँड्स संघाचे हौसले तरीही बुलंद आहेत. (Ind vs Ned)
‘स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळण्याच्या कल्पनेनेच आम्ही खुश आहोत. चांगल्या संघाबरोबर खेळण्याची ही आणखी एक संधी आहे,’ असं डच खेळाडू निदामानुरू इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला. नेदरलँड्स संघाने स्पर्धेत दोन विजय तर मिळवले पण, त्यांच्या कामगिरीत सातत्य नसल्याची खंतही निदामानुरूने बोलून दाखवली. (Ind vs Ned)
(हेही वाचा – Laxmi Pujan Rangoli : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणती रांगोळी काढावी ?)
डच संघ हा आयसीसीचा असोसिएट सदस्य आहे. पूर्णवेळचा सदस्य नाही. त्यामुळे पात्रता फेरीतून इथपर्यंत पोहोचलेल्या नेदरलँड्स सारख्या संघाला वर्षभर अव्वल संघांशी फारसं खेळता येत नाही. पण, अफगाणिस्तान सारखी सातत्याने खेळायची संधी मिळाली, आयपीएल किंवा इतर लीगची कवाडं उघडली तर डच खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करतील, असं या डच खेळाडूला वाटतंय. आताही भारताविरुद्ध डच संघाला तेच करायचं आहे. तांत्रिक दृष्ट्या निकोप खेळ करण्यावर त्यांचा भर असेल. समोर अव्वल संघ आहे याचा उलट त्यांना आनंदच आहे. कारण, अव्वल संघाशी दोन हात करण्याची संधी त्यांना मिळतेय. (Ind vs Ned)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community