Ashutosh Rana यांना व्हायचे होते वकील; पण झाले कलाकार

184
Ashutosh Rana हे खूप मोठे अभिनेते तर आहेतच. त्याचबरोबर ते लेखक व कवी देखील आहेत. त्यांनी मराठी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ते सिनेसृष्टीमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. गुलाम चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली.
Ashutosh Rana यांचा जन्म १० नोव्हेंबर १९६४ रोजी मध्य प्रदेशच्या गाडरवारामध्ये झाला. त्यांचे खरे नाव आशुतोष रामनारायण नीखरा असे आहे. त्यांनी डॉ. हवी सिंह गौर युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केले. स्थानिक रामलीलामध्ये ते रावणाची भूमिका करायचे. तेव्हापासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी अनेक नकारात्मक भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत.
त्यांनी संशोधन, तमन्ना, दुष्मन, गुलाम, संघर्ष, राझ, सिंबा, हंगामा-३ अशा अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर इतर भाषांमधूनही त्यांनी काम केले आहे. संकासूर आणि येडा या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. तसेच तेहतीकात, आहट, एक्स-झोन, वारीस, फर्झ अशा अनेक मालिकांमध्ये ते टीव्हीच्या रसिकांचे चाहते झाले.
Ashutosh Rana यांनी  मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासोबत विवाह केला असून त्यांना दोन मुलं आहेत. आशुतोष राणा लिखित “मौन मुस्कान की मार” आणि “रामराज्य” ही पुस्तके खूप गाजली. या पुस्तकांमुळे त्यांना साहित्यिक म्हणून नावलौकिक प्राप्त झाले.
“हे भारत के राम जगो, मैं तुम्हे जगाने आया हूँ,
सौ धर्मों का धर्म एक, बलिदान बताने आया हूँ।
सुनो हिमालय कैद हुआ है, दुश्मन की जंजीरों में
आज बता दो कितना पानी, है भारत के वीरो में,”
किंवा
“प्रिय! लिखकर
नीचे लिख दूँ नाम तुम्हारा
कुछ जगह बीच में छोड़
नीचे लिख दूँ सदा तुम्हारा
और लिखा बीच में क्या? ये तुमको पढ़ना है
कागज़ पर मन की भाषा का अर्थ समझना है
और जो भी अर्थ निकालोगी तुम, वो मुझको स्वीकार
मौन अधर, कोरा कागज़, अर्थ सभी का प्यार..”
ह्या त्यांच्या कविता वाचून त्यांच्या काव्यशक्तीचा अंदाज नक्कीच आला असेल. आपल्या अभिनयाद्वारे नावारुपाला आलेले आशुतोष यांना वकील व्हायचं होतं. पण त्यांच्या गुरुंनी अभिनेता होण्याचा सल्ला दिला. गुरुंनी सांगितलं की ’या क्षेत्रात तुला यश मिळेल’.
गुरुंच्या आदेशानुसार ते या क्षेत्रात आले. एनएसडी मध्ये अभिनयाचा कोर्स पूर्ण केला आणि ते चित्रपटांच्या दुनियेत आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.