MMRDA : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर…..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दिवाळी गोड...

130
MMRDA : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर.....!
MMRDA : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर.....!
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना (MMRDA) यावर्षी दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या प्रस्तावाला रात्री उशिरा मान्यता दिली. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय जाहीर करताना स्पष्ट केले की, दिवाळी सणाचा गोडवा द्विगुणित व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएचे कर्मचारी हे एक महत्वाच्या विकास यंत्रणेचे आणि या कुटुंबाचे सदस्य म्हणून काम करतात. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईल, म्हणून हा गेल्या वर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आनंद बहुमोल आहे.’ वाढीव अनुदान जाहीर केल्याने एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
एमएमआरडीएचे (MMRDA) आयुक्त डॉ. मुखर्जी यांनी, सानुग्रह अनुदानाचा हा निर्णय म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच ठरेल. कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात जाईल, ते प्राधिकरणाच्या कामात आणखी उत्साहाने योगदान देत राहतील, असा विश्वासही व्यक्त केला.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=6zwjGTVxSNc

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.