Sea Link Accident : मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ३ ठार, ९ जखमी

186

वांद्रे-वरळी सी-लिंकच्या (Sea Link Accident) वांद्रे दिशेने टोल प्लाझा येथे उभ्या असलेल्या एकूण सहा वाहनांना एका भरधाव कारने धडक दिली. गुरुवारी (९ नोव्हेंबर) रात्री झालेल्या या भीषण अपघात ३जणांचा मृत्यू झाला ,असून ९ जण जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी वांद्रे सी लिंक (Sea Link Accident) येथून एक कार भरधाव वेगाने वांद्र्याच्या दिशेने जात होती, भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार सी लिंकवरील टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ३ वाहनांना धडक देत पुढे गेली. या भीषण अपघातात ६ वाहनांचे नुकसान होऊन तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला असून ९जण जखमी झाले आहे.

(हेही वाचा – Weather Update: येत्या ४ दिवसांत पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट)

घटनास्थळी दाखल झालेल्या वांद्रे पोलिसांनी तात्काळ (Sea Link Accident) अपघातात जखमी झालेल्यांना वांद्रे भाभा रुग्णालयात दाखल केले असून जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात कार चालक देखील जखमी झाला असून वांद्रे पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. (Sea Link Accident) कार चालक हा नशेत होता की नाही हे वैद्यकीय अहवाल नंतर कळेल तसेच या अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.