Amarnath Yatra: आता अमरनाथ यात्रेला कारने जाता येणार, बीआरओकडून रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण

अमरनाथ धाम हे पर्वताच्या कुशीत दक्षिण काश्मीरमध्ये ३८८८ मीटर उंचीवर वसले आहे.

199
Amarnath Yatra: आता अमरनाथ यात्रेला कारने जाता येणार, बीआरओकडून रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण
Amarnath Yatra: आता अमरनाथ यात्रेला कारने जाता येणार, बीआरओकडून रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण

पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. या यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सीमा रस्ते संघटनेकडून उपाययोजना करण्यात आली आहे.

सीमा रस्ते संघटना (BRO)ने नुकताच अमरनाथ यात्रेला मोटारीने जाता यावे, याकरिता रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे आता भक्त आणि भाविकांना आता अमरनाथ धामपर्यंत मोटारीने अमरनाथ यात्रेला जाणे शक्य होणार आहे.

भगवान शिवाचे स्थान असलेले अमरनाथ धाम हे पर्वताच्या कुशीत दक्षिण काश्मीरमध्ये ३८८८ मीटर उंचीवर वसले आहे. तेथे पोहोचणे म्हणजे भाविकांची कसोटी असते. दुमल येथून बालटाल बेस कँम्पमार्गे हा रस्ता थेट अमरनाथपर्यंत बांधून एक इतिहास रचण्यात आला, अशी माहिती बीआरओकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीर प्रशासनाने या दुहेरी रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी बीआरओकडे दिली होती. त्यानुसार, हा रस्ता मोटारीने जाण्यायोग्य दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भाविकांची सहज सुलभ पद्धतीने अमरनाथ धामपर्यंत पोहोचण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

(हेही वाचा – MMRDA : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर…..! )

पर्यावरणवाद्यांनी बीआरओकडून (Border Roads Organisation) करण्यात आलेल्या या रस्ते दुरुस्तीबाबत धोक्याचा इशारा दिला आहे तसेच पीडीपीने याला सर्वात मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, या रस्त्यामुळे हिमालयातील उतार अस्थिर होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार वाढू शकतात. सरकारने दाल सरोवर, सोनमर्ग, पहेलगाम आदी परिसरता बांधकामांना पूर्णपणे बंदी घातली आहे.

परंपरा कायम ठेवण्याचा आशावाद
काश्मीरमधील नागरिक शेकडो वर्षांपासून अमरनाथ यात्रेला आलेल्या भाविकांना खांद्यावर वाहून नेतात. ही परंपरा कायम चालू राहिल. कदाचित अनेक भाविकांना कारने यात्रेला जावे, असे वाटणार नाही. माता वैष्णोदेवीला जातात त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने अमरनाथ यात्रेला जाणे पसंत करतील आणि स्थानाचे पावित्र्य राखतील, अशी आशा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.