Anti-Narcotics Task Force : अमली पदार्थावर आळा घालण्यासाठी ‘अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स’ 

135
Anti-Narcotics Task Force : अमली पदार्थावर आळा घालण्यासाठी 'अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स' 
Anti-Narcotics Task Force : अमली पदार्थावर आळा घालण्यासाठी 'अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स' 
अमली पदार्थ आणि अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत महाराष्ट्र पोलिसांचे “झिरो टोलरन्स” धोरण असणार आहे. उच्च अधिकार्‍यांनी गुरुवारी सांगितले की, याच्यावर  आळा घालण्यासाठी राज्यात लवकरच इंस्पेक्टर-जनरल दर्जाच्या (आयजी) अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (Anti-Narcotics Task Force) तयार करण्यात येईल पोलिस अंमली पदार्थांच्या अंमलबजावणीसाठी “अप अँड डाऊन” दृष्टीकोन घेत आहेत, ज्या अंतर्गत चौकशीत सप्लायरवर तसेच पेडलिंग यांच्या शेवटच्या टोकापर्यंतची माहिती मिळण्यात येईल.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) प्रमुख सदानंद दाते आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) संजय सक्सेना यांनी निदर्शनास आणले की अंमली पदार्थ बाळगण्याची प्रकरणे २०२२ मध्ये १,८२३ वरून  या वर्षी ऑक्टोबरपर्यंत २,४९१ वर गेली आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत हा आकडा १,५३० होता. २०२२  मध्ये २,२७४ लोकांना अटक करण्यात आली होती,  तर २०२३ मध्ये आत्तापर्यंत ३,२७७ जणांना अटक करण्यात आली.
२०२२  मध्ये अमली पदार्थ घेणाऱ्यांची संख्या  ११,८२४ होती आणि या वर्षी ऑक्टोबरपर्यंत १०,५३६ होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत हा आकडा ९,५५३ होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २०२२ मध्ये एकूण १०,८३१ जणांना अमली पदार्थ सेवन प्रकरणात अटक करण्यात आली होती, तर या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पकडलेल्या लोकांची संख्या १०,२३५ होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंतच्या याच कालावधीत हा आकडा ९,७००होता.

(हेही वाचा-Indigo: इंजिनमधील तांत्रिक दोषाचा विमान कंपन्यांना फटका, इंडिगोची ३० विमाने लवकरच जमिनीवर)

राज्य पोलिसांनी केलेल्या अमली पदार्थ कारवाई बाबत तपशील देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मार्चमध्ये अंमली पदार्थ विरोधी सेलने गुजरातमधील दोन कारखान्यांचा पर्दाफाश केला, परिणामी १,४०३ कोटी रुपये किमतीचे २,४२८ किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आणि आठ जणांना अटक करण्यात आली. एटीएसने ३६२ कोटी रुपयांचे ७२  किलो हेरॉईन जप्त करून सहा जणांना ताब्यात घेतले होते.
या वर्षी ऑगस्टमध्ये, मुंबईतील साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज निर्मितीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला, परिणामी ३०० कोटी रुपयांचे १५१ किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आणि १६  जणांना अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात, ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथून पोलिसांनी ३६.९० कोटी रुपयांचे १८.४५३ किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त केले गेले. गेल्या महिन्यात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट  ९ ने सोलापुरातील एका कारखान्याचा पर्दाफाश करून १६ कोटी रुपये किमतीचे ८ किलोग्रॅम पेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त केले होते, तर वीरेंद्र नाईक या आर्थर रोड कारागृहात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराला ७१  ग्रॅम चरस मिळाल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. ते त्याच्या ताब्यात सापडले होते.
यावर्षी ऑक्‍टोबरपर्यंत एकूण ५,२२४ किलोग्राम गांजासह १७३ किलो मेफेड्रोन आणि २ किलो हेरॉईन नष्ट करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ जून रोजी अंमली पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात २७  लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला, ते म्हणाले, जालना सारख्या ठिकाणी अशा २४  सुविधा उघडल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या १०३  वरून वाढेल असे ते म्हणाले.
अधिका-यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांना अटक केली जात असल्याने राज्याच्या अनेक भागात डिटेन्शन सेंटर्स बांधली जात आहेत.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=6zwjGTVxSNc

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.