Winter Session Of Parliament : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला ४ डिसेंबरपासून होणार सुरुवात

महत्त्वाच्या तीन विधेयकेवर चर्चा होण्याची शक्यता

124

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच म्हणजेच दुसऱ्या दिवशी ४ डिसेंबर रोजी संसदेच्या (Winter Session Of Parliament) हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली.

यासंदर्भात प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, यंदाचे (Winter Session Of Parliament) हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबरदरम्यान होणार आहे. सुमारे १९ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात १५ बैठका होणार आहेत. प्रल्हाद जोशी यांनी X म्हणजेच ट्विटरवर ही माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. तर ४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन महत्वाचे असणार आहे.

(हेही वाचा – Amarnath Yatra: आता अमरनाथ यात्रेला कारने जाता येणार, बीआरओकडून रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण)

गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीने नुकतेच तीन (Winter Session Of Parliament) अहवाल स्वीकारले आहेत. त्यानुसार, आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्टची जागा घेणारी ३ महत्त्वाची विधेयके या अधिवेशनात विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे. संसदेत प्रलंबित असलेले दुसरे मोठे विधेयक, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. (Winter Session Of Parliament)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.