ऋजुता लुकतुके
खरं सांगायचं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या (ICC ODI World Cup 2023) उपान्त्य फेरीच्या आशांना न्यूझीलंडच्या श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर मोठा सुरुंग लागला आहे. कारण, न्यूझीलंडने आधी लंकन संघाला १७१ धावांमध्ये गुंडाळलं. आणि मग विजयासाठी आवश्यक १७२ धावा त्यांनी ५ गडी गमावत पण, २४व्या षटकांतच पार केल्या. या मोठ्या विजयामुळे आता रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंड संघ इतर दोन संघांच्या पुढे गेला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचे ९ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. आणि त्यांचा नेट रनरेट आता आहे ०.७४३, न्यूझीलंडला मागे टाकायचं असेल तर पाकला इंग्लंड विरुद्ध खूप मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल. कारण, त्यांचा रनरेट सध्या आहे ०.०३६.
(हेही वाचा-Electricity Employees Diwali Bonus : वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार खास; १८,५०० रुपयांचा बोनस जाहीर)
न्यूझीलंडपेक्षा पुढे जाण्यासाठी त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडला २८७ धावांनी हरवावं लागेल. आणि त्यांची दुसरी फलंदाजी असेल तर २८७ चेंडू राखून त्यांना विजय मिळवावा लागेल. या दोन्हीही अशक्यप्राय गोष्टी आहेत. आणि अफगाणिस्तानचा नेट रनरेट तर सध्या उणे आहे. त्यामुळे त्यांना उपान्त्य फेरीची संधी जवळपास नाहीच आहे.
Pakistan now has to beat England at the Eden Gardens on Saturday by an #unattainable margin
by around 287 runs while batting 1st
or
by about 284 balls to spare while chasing!#NZvsSL #NZvsSL #SLvNZ #SLvsNZ#CWC #CWC2023 #CWC23 #PakvsEng #PakvEng #EngvsPak #CricketTwitter— Mohandas Menon (@mohanstatsman) November 9, 2023
श्रीलंकन संघाचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. त्यांच्याबरोबरच इंग्लंड, बांगलादेश आणि नेदरलँड्सचंही आव्हान संपलेलं आहे. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला एखादा चमत्कारच वाचवू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community