Richards on Virat Kohli : ‘विराट कोहली ही क्रिकेटला लाभलेली देणगी’

वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिर्चर्ड्स यांनी विराट कोहलीचं कौतुक करताना ‘तो सर्वकालीन दिग्गज खेळाडू’ असल्याचं सिद्ध झालंय असं म्हटलंय.

170
Richards on Virat Kohli : ‘विराट कोहली ही क्रिकेटला लाभलेली देणगी’
Richards on Virat Kohli : ‘विराट कोहली ही क्रिकेटला लाभलेली देणगी’

ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनी विराट कोहलीचं (Richards on Virat Kohli) कौतुक करताना तो म्हणजे क्रिकेटला लाभलेलं वरदान असल्याचं वक्तव्य केलं आहे. आव्हानात्मक परिस्थितीत ज्या पद्धतीने तो यशस्वी होतो ते केवळ त्याच्या मानसिक कणखरतेमुळे शक्य आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विराट कोहलीने अलीकडेच कोलकात्या ईडन गार्डन्सवर आपल्या ३५ व्या वाढदिवसाच्या दिवशी, सचिनच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. तर या विश्वचषकात सध्या तो धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने ९ सामन्यांत ५४३ धावा केल्यात त्या १०८ धावांच्या सरासरीने. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि न्यूझीलंडचा रचिल रवींद्र त्याच्या पुढे आहेत.

२०१९ पासून पुढील ३ वर्षं विराट कोहली (Richards on Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवू शकला नव्हता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली. स्वत:साठी वेळ दिला. आणि त्यानंतर २०२३ मध्ये आपल्याला नवीन विराट कोहली दिसत आहे. पुन्हा विराट परतला तो आशिया टी-२० स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकतच.

‘विराट साहसी क्रिकेटपटू आहे. स्वत:वर विश्वास ठेवतो. आणि कौशल्याचा मेहनतीची जोड देतो. यापूर्वी जेव्हा केव्हा मी त्याच्याशी बोललोय, मला त्याच्या मनाचा कणखरपणा नेहमी जाणवलाय. आणि त्यामुळेच तो इतर फलंदाजांपेक्षा पुढे आहे,’ असे उद्गार रिचर्ड्स यांनी काढले.

(हेही वाचा-Vodafone and Idea : व्होडाफोन आणि आयडिया कंपनीला ११२८ कोटी रुपयांचा परतावा द्या)

रिचर्ड्स यांनी आयसीसी वेबसाईटला ही मुलाखत दिली आहे. आणि यात त्यांनी विराटचं अखंड कौतुक केलं आहे.

आपण सुरुवातीपासूनच विराटचे चाहते आहोत. आणि या खेळातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याचं त्याने वारंवार सिद्ध केलंय, असंही रिचर्ड्स यावेळी बोलताना म्हणाले. रिचर्ड्स यांनी या मुलाखतीत युवा शुभमन गिलचंही कौतुक केलं. आणि सध्याच्या खेळाडूंमध्ये तो सगळ्यात शैलीदार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

तर ग्लेन मॅक्सवेलच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या खेळीने ते ही अचंबित झाले आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत मारलेली मजल रिचर्ड्स यांनाही सुखावून गेली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.