भारतीय गिर्यारोहक प्रियंका मंगेश मोहिते हिने अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई करून नवा इतिहास लिहिला आहे. १६ एप्रिल रोजी प्रियंका दुपारी १२.३० वाजता शिखराच्या टोकावर पोहचली. अशा प्रकारे या शिखरावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक म्हणून तिचा नावलौकिक झाला आहे.
वयाच्या २१व्या वर्षी एव्हरेस्ट चढला!
महाराष्ट्राची कन्या असलेली प्रियंका मोहिते हिने २०१३ साली अवघ्या २१व्या वर्षांत एव्हरेस्ट पर्वत यशस्वी चढला होता. सर्वाधिक कमी वयात हा पर्वत चढणारी प्रियंका ही तिसरी भारतीय महिला ठरली होती. प्रियंका नेहमी म्हणते कि, जेव्हा तिने गंगोत्रीमध्ये पहिल्यांदा बर्फ पाहिला, तेव्हाच तिला साक्षात्कार झाला कि, तिचा जन्म हा गिर्यारोहणासाठीच झाला आहे. तिने उत्तराखंड येथील ६ हजार ३१६ मीटर उंच बंदरपंच पर्वताची यशस्वी चढाई करून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. उत्तराखंडमधील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमधून प्रियंका हिने गिर्यारोहणाचे धडे घेतले.
(हेही वाचा : वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशीपचा अंतिम सामना या चेंडूने खेळला जाऊ शकतो!)
८ हजार मीटर उंचीचा आहे अन्नपूर्णा पर्वत!
नेपाळ येथील हा अन्नपूर्णा पर्वत चढाई करण्यात खूप अवघड समजला जातो. अनेक गिर्यारोहकांची दमछाक होत असते. याची उंची सुमारे ८ हजार ९१ मीटर इतकी आहे. याआधी सहा भारतीयांनी हे शिखर यशस्वी चढले आहे. मात्र एक महिला गिर्यारोहक म्हणून प्रियंका हिचा नावलौकिक झाला आहे. प्रियंकाने हा पर्वत कसोशीने चढाई करून देशाचा गौरव केला आहे.
चढण्यासाठी जगात सार्वधिक अवघड पर्वत!
हा पर्वत जगभरातील सर्वात उंच पर्वतांमध्ये १०व्या क्रमांकावर येतो. मात्र हा पर्वत चढण्यासाठी जगातील सर्वाधिक अवघड समजला जातो. त्यामुळेच हा पर्वत चढताना आतापर्यंत ४० गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, यावरून याचा प्रत्यय येतो.
Join Our WhatsApp Community