Virender Sehwag : “पाकिस्तान झिंदा – भाग…” ; जाणून घ्या वीरेंद्र सेहवाग नेमकं काय म्हणाला

124
Virender Sehwag : विरेंद्र सेहवागने कारकीर्दीत किती षटकार ठोकले?

मागील बारा वर्षांत प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तान श्रीलंकेवर अवलंबून होता. परंतु गुरुवारी (९ नोव्हेंबर) बेंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडने ५ विकेट्स ठेऊन विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तान संघाचे या स्पर्धेत टिकून राहण्याचे स्वप्न भंगले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा (Virender Sehwag) माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या शैलीनुसार पाकिस्तानी संघासाठी एक विशेष पोस्ट केली आहे. सध्या ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

सेहवागने (Virender Sehwag) या पोस्टमध्ये सूचकपणे “पाकिस्तान झिंदा – भाग” असं म्हंटल आहे.

नेमकं काय म्हणाला सेहवाग?

“झिंदाभाग! बस एवढंच होतं. जे व्हायचं होतं ते झालं. तुम्हाला आमची बिर्याणी आणि पाहुणचार आवडला असेल असेल अशी आशा आहे. नीट घरी जा, बाय बाय पाकिस्तान “

 

View this post on Instagram

 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

सेहवागने (Virender Sehwag) पुढे श्रीलंकेवरही टीका केली आणि म्हटले की, ‘पाकिस्तानची खास गोष्ट म्हणजे ज्या संघाला पाकिस्तानचा पाठिंबा आहे, तो संघ पाकिस्तानसारखाच खेळायला सुरुवात करतो. (One special thing about Pakistan is that whichever team they support that side begins to play like Sri Lanka). माफ करा श्रीलंका.”

(हेही वाचा – Internet in Flight : ही पहिली भारतीय विमान कंपनी देणार वायफाय, ३५ हजार फुटांवरही मिळणार सुविधा)

पाकिस्तान (Virender Sehwag) अजूनही गणिताच्या दृष्टीने उपांत्य फेरीच्या शर्यतीत जिवंत आहे. मात्र न्यूझीलंडच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत करणं आवश्यक आहे. जर त्यांनी शनिवारी (११ नोव्हेंबर) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या उपांत्य साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी केली तर पाकिस्तानला जोस बटलरच्या संघाला २८७ फरकांच्या धावांनी किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत करणे आवश्यक आहे. अशातच जर पाकिस्तानची प्रथम गोलंदाजी असली तर मात्र त्यांना काही ठराविक षटकांच्या आत आपलं टार्गेट पूर्ण करावं लागेल. सोप्या शब्दात सांगायचे तर त्यांच्याकडे १५० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी अंदाजे ३.४ षटके असतील.

जर पाकिस्तान अंतिम फेरी गाठण्यात अयशस्वी ठरला तर न्यूझीलंड नॉकआऊटमध्ये आपलं स्थान निश्चित करेल आणि त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड हे संघ सेमी फायनलसाठी समोरासमोर येतील. (Virender Sehwag)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.