ऋजुता लुकतुके
अलीकडे सोशल मीडियावर सगळीकडे तरुण पिढीच्या बोली भाषेतील एक वाक्य ट्रेंड होतंय. ‘Delulu is the only solulu,’ असं हे वाक्य सगळ्यात आधी ट्विटरवर वापरलं गेलं. आणि तिथून सगळ्याच सामाजिक माध्यमांमध्ये ते रुढ झालं. जेनझी पिढीची हा सध्याचा परवलीचा शब्द किंवा वाक्प्रचार विराट कोहलीला मात्र ठाऊक नव्हता. (Virat Kohli Baffled)
देलुलू आणि सोलुलू हे काय शब्द आहेत असा त्याचा प्रतिप्रश्न होता. त्याचा कसा गोंधळ उडाला ते पाहूया…
(हेही वाचा-NCP : दिवाळीनिमित्त गोविंदबागेत पवार कुटुंबीय एकत्र येणार ?)
lmaooo virat kohli can’t believe the word delulu exists pic.twitter.com/5mMAsLOFxC
— de little delulu show (@MrNarci) November 7, 2023
स्टार स्पोर्ट्सच्या एका चॅटशोमध्ये विराटला देलुलू इज द ओन्ली सोलुलू हे वाक्य पुन्हा म्हणून दाखवायचं होतं. विराटला वाक्य ऐकून हसू आलं. आणि तो उत्तरादाखल म्हणतोय, ‘या भाषेत कोण बोलतं? काय आहे हे?’
देलुलू हा शब्द खरंतर के-पॉप फॅन कम्युनिटीतून २०१४ साली आला आहे. डिल्युजन म्हणजेच आभास किंवा भ्रामक. आणि सोलुलू म्हणजे सोल्युशन किंवा उत्तर. आणि देलुलू इज द ओन्ली सोलुलू याचा अर्थ सध्याच्या पिढीच्या भाषेत असा की, तुम्ही कुठलंही स्वप्न बघायला कचरू नका. ते पूर्ण होऊ शकतं. आणि सकारात्मक विचार काहीही बदलू शकतात.
विराट कोहलीने आताच्या विश्वचषकात १०८ धावांच्या सरासरीने ५४३ धावा केल्या आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community