Israel Hamas War : ती’ ४५ मिनिटे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा सुन्न करणारा उन्माद…

धडापासून डोकं वेगळं होईपर्यंत मानेवर फावडं हाणत रहायचं... इतकं क्रौर्य, इतका निर्दयपणा करायला धर्म सांगतो? दुष्टांचं निर्दालन करणारा तो देव. पण यांचा देव, तो अल्ला त्याला न मानणार्‍याला मारायला सांगतो, त्याला जगण्याचा अधिकारच नाकारतो??

135
Israel Hamas War : ती’ ४५ मिनिटे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा सुन्न करणारा उन्माद...
Israel Hamas War : ती’ ४५ मिनिटे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा सुन्न करणारा उन्माद...

मंजिरी मराठे

जे बघितलं त्यामुळे डोकं बधिर झालं आहे, मन सुन्न झालं आहे. (Israel Hamas War) जगात क्रूर, विकृत माणसं आहेतच. पण धर्माच्या नावाखाली, दुसर्‍याचा जगण्याचा अधिकारच छिनावून घेणारी, माणसांना किडामुंगीसारखं चिरडून आनंदोत्सव साजरा करणार्‍यांना माणसं कसं म्हणायचं ? त्यांना पशू म्हटलं, तर पशूंचाही अपमान होईल इतकं क्रौर्य पाहिलं.

आपण सारे आज दिवाळी साजरी करतो आहोत; पण दूर इस्रायलमध्ये अनेक घरांत कायमचा अंधार पसरला आहे. अनेक घरं निर्वंश झाली आहेत. मुलं पोरकी झाली आहेत. मुलांच्या डोळ्यादेखत आई वडील मारले गेले आहेत. आई-वडिलांबरोबर लहानगे जीव, अगदी लहान बाळं, मुके प्राणी यांची हमासच्या हैवानांनी हसत हसत शिकार केली. माणसांना अगदी सहज गोळ्या घातल्यानंतरचा त्यांचा उन्माद, आसुरी आनंद भीषण होता. (Israel Hamas War)

(हेही वाचा – Muhurat Diwali Pooja : यंदा लक्ष्मीपूजन केव्हा करावे ?)

इस्रायल काॅन्सुलेटने काही ठराविक मंडळींना ४५ मिनिटांचे ते भीषण व्हिडीओ दाखवले. गोप्रो वापरून अतिरेक्यांनी काढलेले, बाधितांच्या मोबाईलमधले, गाडीमधल्या कॅमेर्‍यातले हे व्हिडीओ. हमासने मोठ्या कौतुकानं ते समाज माध्यमांवरही व्हायरल केले. धडापासून डोकं वेगळं होईपर्यंत मानेवर फावडं हाणत रहायचं… इतकं क्रौर्य, इतका निर्दयपणा करायला धर्म सांगतो? दुष्टांचं निर्दालन करणारा तो देव. पण यांचा देव, तो अल्ला त्याला न मानणार्‍याला मारायला सांगतो, त्याला जगण्याचा अधिकारच नाकारतो??

Israel Hamas War : ती’ ४५ मिनिटे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा सुन्न करणारा उन्माद...
Israel Hamas War : ती’ ४५ मिनिटे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा सुन्न करणारा उन्माद…

आपल्या पूर्व बंगालमधील नौखालीत झालेला हिंदूंचा नरसंहार, स्त्रियांवरील अत्याचार भाषाप्रभू पु. भा. भावे यांच्या कथेतून समजला होता, काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाबद्दल वाचलं होतं, देशातील, मुंबईतील दहशतवादी हल्ले पाहून आपण सारेच हादरलो होतो. पण मी जे पाहिलं ती दृश्य डोळ्यासमोरून जात नाहीत. (Israel Hamas War)

(हेही वाचा – Israel Hamas Conflict: हमासकडून इस्त्रायलच्या वाहनांचा विध्वंस, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर)

आपल्या सारखीच हाडामासाची माणसं आणि इतकं क्रौर्य. आज प्रेतांचा खच पाहिला. जळलेली असंख्य प्रेतं पाहिली. रक्तामांसाचा चिखल पाहिला, छिन्न विछिन्न देहांचे डोंगर पाहिले. लांबच लांब रस्त्याच्या दुतर्फा अतिरेक्यांच्या क्रौर्याला बळी पडलेल्यांच्या गाड्यांच्या रांगा पाहिल्या. मेलेल्यांनाही परत परत गोळ्या घालून हसत हसत ‘अल्ला हो अकबर’चा ओरडा करणारा दहशतवाद्यांचा उन्माद पाहिला. आई वडिलांना फोन करून सांगितलं, “व्हॉट्सअप पहा, व्हॉट्सअप पहा”, मारलेल्या माणसाच्याच मोबाईलमधून व्हॉट्सअप केलं आहे. तुमचा मुलगा हिरो झाला आहे. तुमच्या मुलानं दहा जणांना ठार मारलं आहे” असं दहा वेळा सांगत असलेल्या मुलाला वडील सांगतात, त्यांची मुंडकी आणा, ती पायदळी तुडवा.. (ते हैवान असा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ आपल्यापैकी अनेकांनी बघितला असेल) मुलगा आईला फोन द्यायला सांगतो, आई फोन घेते आणि आनंदानं रडत रडत आपल्या मुलाला सांगते… ठार मार, ठार मार, ठार मार. मुलाला असं शिकवणारे आई वडील असतात?? गाझापट्टीत पकडल्या गेलेल्या इस्रायली सैनिकांना ठार करून हमासच्या हैवानांनी त्यांच्या डोक्यावर लाथा घातल्या आणि असं करणारे केवळ हमासचे दहशतवादी नव्हते तर गाझा पट्टीतले नागरिकही होते. (Israel Hamas War)

७ ऑक्टोबरला सुक्कोथ सणाच्या निमित्तानं रेईम म्युझिक फेस्टिवलसाठी जमलेल्या हजारो नागरिकांवर हमासच्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. गाड्यांवर गोळीबार केला. त्या गाड्यातल्या प्रेतांना केस, कपडे, हात पाय, जे हाती लागेल ते धरून खेचत बाहेर काढलं. एखाद्याच्या शरीरात जरा धुगधुगी वाटली तर गोळ्या घालून त्याची चाळण केली.

(हेही वाचा – Hamas Support Rally in Kerala : केरळचा होतोय काश्मीर…)

घराघरात अगदी बालवाडीत शिरून लोकांना टिपलं. अशाच एका घरातला व्हिडीओ. आई वडील मारले गेलेली दोन मुलं आधी जीव वाचवण्यासाठी घरभर धावतात. गोळ्या लागून एका मुलाची दृष्टी गेली आहे. तो सांगत असतो, मला काही दिसत नाहीये. दुसर्‍याला ते खरं वाटत नाही. माझी आई कुठे आहे, मला आई हवी म्हणून जिवाच्या आकांताने ओरडणारा तो, मलाही मारून टाका म्हणू लागतो. व्हिडीओ कट होतो. नंतर येणारे आवाज, किंकाळ्या काय झालं असेल ते सांगून जातात. (Israel Hamas War)

आपल्याकडच्या स्वतःला बुद्धिवादी समजणार्‍या, एसीमध्ये बसून गप्पा छाटणार्‍या, आपली विकलेली लेखणी चालवणार्‍या अनेकांना, इस्रायलनं हमासचा प्रतिशोध घेणं माणुसकी विरोधी वाटतं आहे. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणं योग्य की अयोग्य ते विचारा आपल्याच देशातल्या दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या, अपंगत्व आलेल्या निरपराध नागरिकांच्या नातलगांना. विचारा आजतागायत हौतात्म्य पत्करत असलेल्या आपल्या वीर जवानांच्या वीरमातेला, वीर पत्नीला, पोरक्या झालेल्या त्यांच्या चिमुकल्यांना आणि ओठ फाटले आहेत; नाक, कवटी फुटली आहे; हातापायाची हाडं मोडली आहेत; डोळे फुटले आहेत; शरीरावर चटके आहेत, अशा अवस्थेतील आपल्या लाडक्या लेकाचा मृतदेह ताब्यात घेणार्‍या हुतात्मा सौरभ कालियाच्या आई वडिलांना विचारा. आपआपल्या घरात सुखेनैव सण साजरा करणारे आपण, दूर देशीच्या, आपल्याच ज्यू बांधवांच्या इस्रायलला, निदान आम्ही तुमच्या बरोबर आहोत इतकं सांगण्याची तरी संवेदनशीलता दाखवू या. हे संकट तुमच्या सीमेवरच नाही, तर देशात खोलवर पसरत आहे, ते जेव्हा आपल्याच घराचं दार ठोठावेल तेव्हा माणुसकीचा गळा घोटला म्हणून गळे काढून उपयोग होणार नाही, तर आलेल्या संकटावर स्वार व्हावं लागेल आणि इस्रायलप्रमाणे प्रत्येक नागरिकाला सैन्याच्या बरोबरीनं उभं रहावं लागेल… आणि तो दिवस फार दूर नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.