Firecracker Stalls In Mumbai : दादरसह मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी पावलोपावली फटाक्यांचे स्टॉल्स

मुंबई सध्या प्रदुषणाचे प्रमाण प्रचंड वाढलेले असल्याने न्यायालयानेही फटाके वाजवण्यावर वेळेचे निर्बंध घातले आहेत.

160
Firecracker Stalls In Mumbai
Firecracker Stalls In Mumbai

मुंबई सध्या प्रदुषणाचे प्रमाण प्रचंड वाढलेले असल्याने न्यायालयानेही फटाके वाजवण्यावर वेळेचे निर्बंध घातले आहेत. असे असतानाच मुंबईत सध्या फटाके विक्री जोरात सुरु असून मुंबईतील अनेक दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. दादर पश्चिम येथील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी पावला पावलावर फटाके विक्रीची दुकाने थाटली असून यामुळे दादरच्या परिसरात या फटाक्यामुळे आगीची दुर्घटना घडण्याची भीती वर्तवली जात आहे. परंतु याकडे महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचा दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे फटाक्यांमुळे आगीची दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. (Firecracker Stalls In Mumbai)

New Project 55 1

मुंबईत मागील काही दिवसांपासून हवेतील प्रदुषणात वाढ झालेली असून हे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना केली जात आहे. या वाढत्या प्रदुषणाबाबत न्यायालयानेही महापालिकेचे कान उपटत फटाके रात्री सात ते दहा या वेळेत वाजवण्याची वेळेची मर्यादा घालून दिली होती, परंतु शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने कमी प्रदुषण करणारे आणि कमी आवाजाचे फटाके हे रात्री आठ ते दहा या वेळेतच फोडण्यास परवानगी दिली आहे. (Firecracker Stalls In Mumbai)

New Project 56 2

मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत यंदा फटाक्यांची विक्री कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नाही. फटाक्यांची विक्री करण्यासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेऊन आग प्रतिबंधक उपाययोजना आखत हा व्यावसाय करण्यास परवानगी दिली जाते. परंतु मुंबईमध्ये सध्या फटाक्यांची विक्री जोरात सुरु आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स टाकून फेरीवाले याचा व्यावसाय करताना दिसत आहे. (Firecracker Stalls In Mumbai)

New Project 57 2

दादर पश्चिम येथील स्थानकासमोरील केशवसूत उड्डणपूलाखालील प्रत्येक गाळ्यांमधील दोन्ही बाजुच्या प्रवेशद्वारा जवळ फटाक्यांचे स्टॉल्स थाटले गेले असून सुविधा समोरील पुलाखाली, डिसिल्व्हा रोडवर विसावा हॉटेल जवळ, जावळे मार्गावर विजय नगर इमारतीखाली फटाक्यांची दुकाने थाटली गेली आहेत. एका बाजुला फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अशाप्रकारे अनधिकृत स्टॉल्स लावून विक्री करणाऱ्या फटाक्यांवर कारवाई करणे आवश्यक असतानाच महापालिका आणि पोलिस हे या फटाके विक्रेत्यांना अभय देत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Firecracker Stalls In Mumbai)

New Project 58 1

दादरमधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा दादरमध्ये मोठ्याप्रमाणात फटाक्यांची विक्रीचे स्टॉल्स लावले गेले आहेत. प्रत्येक गल्लीत पावलापावला हे स्टॉल्स लावले गेले आहेत. हे असे चित्र यापूर्वी कधीच पहायला मिळत नव्हते. परंतु यंदा प्रदुषणाची समस्या मोठी असून न्यायालयानेही फटाक्यांबाबत वेळेचे निर्बंध घालून दिलेले असल्याने किमान जे विनापरवाना फटाके विकतात त्यांच्यावर तरी महापालिकेने कारवाई करावी असे रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दादरमध्ये सध्या खरेदीसाठी ज्याप्रकारे लोकांनी गर्दी केली आहे, त्याच गर्दीमध्ये हे स्टॉल्स असून जर यामुळे एखादी अप्रिय घटना घडल्यास मोठी जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान महापालिकेच्या परवाना विभागाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करायला हवी अशी दादरकरांची इच्छा आहे. दादरप्रमाणे मुंबईत बोरिवली, घाटकोपर, कुर्ला, कांदिवली, मालाड, अंधेरी, भांडुप आदी भागांमध्येही गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लावले गेले आहेत. त्या सर्वांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिला असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. (Firecracker Stalls In Mumbai)

New Project 59 2

(हेही वाचा – Israel Hamas War : ती’ ४५ मिनिटे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा सुन्न करणारा उन्माद…)

तीन दिवसांपूर्वी दादरमध्ये वीर सावरकर मंडईमधील एका गाळ्यात साठा करून ठेवलेला फटाक्यांचा माल महापालिकेने जप्त केला होता. या कारवाईमध्ये महापालिकेने ६७३ किलोचा फटाक्यांचा साठा जप्त केला होता. परंतु त्यानंतरच हे स्टॉल्स अधिक लागल्याने महापालिकेतील माल सोडवून प्रत्येक ठिकाणी स्टॉल्स लावून हा माल विकला जात आहे का असा सवाल आता रहिवाशांकडून केला जात आहे. एका बाजुला फटाक्यांवर कारवाई केली जात नाही, दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी इतर फेरीवाल्यांवर कारवाई करून नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करतात असाही सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. (Firecracker Stalls In Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.