Ayodhya Ram Mandir : राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही

पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत असणार प्रमुख पाहुणे

180
Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी?
Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी?

अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या (Ayodhya Ram Mandir) राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी देशातील कोणतेही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपालांसह कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिले जाणार नाही. श्री राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. अर्थात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमास उपस्थित राहतील.

राष्ट्रीय स्वयंसंघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, (Ayodhya Ram Mandir) राममंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी ८००० विशिष्ट लोकांना निमंत्रण पाठविण्यात येईल. यात ४००० साधुसंतांचा समावेश असेल. सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमात मुख्य अतिथी असणार आहेत.

आंबेकर यांनी सांगितले की, संघ व विहिंप कार्यकर्ते एक जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत देशाच्या प्रत्येक गावात, शहरात (Ayodhya Ram Mandir) राम मंदिराच्या छायाचित्रासह अक्षता घेऊन निमंत्रण देण्यास जाणार आहेत. राममंदिर आंदोलनाशी संबंधित सर्व प्रमुख लोकांना बोलावण्यात येणार आहे. नेत्यांना निमंत्रण न देण्यामागचे कारण सांगतांना अंबेकर म्हणाले की, मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) काम अद्याप पूर्ण नाही. व्हीआयपीच्या येण्याने व्यवस्थेवर ताण पडू शकतो.

(हेही वाचा – Ram Mandir in Ayodhya : अयोध्येतील राममंदिरातील ज्योत देशातील घरोघरी प्रकाश पसरवणार)

अयोध्या सजली

अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) रामजन्मभूमी येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिरातील गर्भगृहात दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांच्या हारांची सजावट करण्यात आली आहे. तसेच भगव्या रंगाच्या पताकांनी हा परिसर सुशोभित केला आहे. राममंदिराच्या उभारणीत व्यग्र असलेल्या कामगारांनीही या मंदिरात सजावट करण्यास हातभार लावला. अयोध्येतील शरयू तीरावर लाखो पणत्या उजळून यावेळीही विक्रम करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवार यांनी घेतली अमित शहा यांची भेट)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण

श्रीरामजन्मभूमी (Ayodhya Ram Mandir) तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची शुक्रवारी (१० नोव्हेंबर) भेट घेऊन त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज जीवन धन्य झाले. मन प्रफुल्लित झाले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट केले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी स्वामी गोविंद देव गिरी महाराज, चंपत राय व राजेंद्र पंकज यांनी प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रण दिले.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.