India To Get MQ 9B : चीनला टक्कर देण्यासाठी अमेरिकेची भारताला मदत; चर्चेच्या पाचव्या फेरीत काय झाले ?

भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षाीय चर्चेची पाचवी फेरी झाली. त्या वेळी ऑस्टिन बोलत होते. या वेळी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकन संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

121
India To Get MQ 9B : चीनला टक्कर देण्यासाठी अमेरिकेची भारताला मदत; चर्चेच्या पाचव्या फेरीत काय झाले ?
India To Get MQ 9B : चीनला टक्कर देण्यासाठी अमेरिकेची भारताला मदत; चर्चेच्या पाचव्या फेरीत काय झाले ?

चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सामरिक मुद्द्यांवर एकमत होत आहे. (India To Get MQ 9B) भारताला लवकरात लवकर ड्रोन क्षमता मिळावी, यासाठी सरकार या दिशेने सतत प्रयत्न करत आहे, असे अमेरिकन संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले. (India To Get MQ 9B)

भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षाीय चर्चेची पाचवी फेरी झाली. त्या वेळी ऑस्टिन बोलत होते. या वेळी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकन संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

(हेही वाचा – Former Naval Officers Qatar : माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची ‘ही’ कार्यवाही)

भारताकडून राजनाथ सिंह यांच्याशिवाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यामध्ये अमेरिकेच्या बाजूचे नेतृत्व अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी केले. भारत-अमेरिका मंत्रीस्तरीय बैठक शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी सुरू झाली.  (India To Get MQ 9B)

ऑस्टिन पुढे म्हणाले, आम्ही बैठकीत सुरक्षा आव्हाने आणि चीनकडून निर्माण झालेल्या धोक्यावर चर्चा केली, परंतु आमचे संपूर्ण संभाषण केवळ या मुद्द्यावर केंद्रित नव्हते.

(हेही वाचा – Acharya J. B. Kripalani : महान क्रांतिकारक आचार्य जे.बी. कृपलानी)

MQ-9B ड्रोनबाबत अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले की, मला आज कोणतीही नवी घोषणा करण्याची गरज नाही. योग्य वेळी ते जाहीर करू. भारताला ही क्षमता मिळावी, यासाठी आम्ही सर्व काही करत आहोत. आम्ही एका बुलेटप्रुफ वाहनाचीही निर्मिती करत आहोत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “स्वतंत्र, मुक्त आणि नियमबद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देशांमधील भागीदारी महत्त्वपूर्ण आहे.” (India To Get MQ 9B)

एमक्यू-9 बी सी गार्डियन ड्रोनची प्रचंड क्षमता

एमक्यू-9बी सी गार्डियन किंवा Predator drones हे जगातील सर्वांत घातक ड्रोन मानले जाते. मोठ्या प्रमाणावरील सागरी मोहिमांदरम्यान हे मानवरहित ड्रोन विमान अनेक कार्ये करण्यास सक्षम आहे.

या ड्रोनची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही परिस्थितीत उपग्रहाद्वारे 30 तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण करू शकते. द सी गार्डियन हे प्रगत सागरी गुप्तचर देखरेख आणि हेरगिरी क्षमतेसह विकसित केले गेले आहे. हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर आणि खाली रिअल-टाइममध्ये शोध आणि गस्त घालण्यास सक्षम आहे. (India To Get MQ 9B)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.