Mumbra Thane Shivsena : ठाण्यात राजकारण तापले; उद्धव ठाकरे ‘या’ शाखेची करणार पाहणी

166
Mumbra Thane Shivsena : ठाण्यात राजकारण तापले; जितेंद्र आव्हाड यांनी केले पोलिसांवरच आरोप
Mumbra Thane Shivsena : ठाण्यात राजकारण तापले; जितेंद्र आव्हाड यांनी केले पोलिसांवरच आरोप

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट शिवसेना आणि उबाठा गटात वाद सुरू आहे. (Mumbra Thane Shivsena) या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीने शाखा पाडली. तसेच, शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी नुकतेच भूमिपूजन केले. शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी भेट देणार आहेत. यावेळी संजय राऊतही उपस्थित असतील. त्यापूर्वीच ठाण्यात राजकीय वातावरण तापले आहे. (Mumbra Thane Shivsena)

(हेही वाचा – Dhanteras 2023 : दिवाळीला सुवर्णझळाळी ! धनत्रयोदशीला भारतियांनी खरेदी केले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे सोने-चांदी)

शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन राजन किणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रॅली न काढणे, सभा न घेणे, आंदोलन न करणे अशा सर्वच गोष्टींवर किणे यांना बंदी घालण्यात आली आहे. (Mumbra Thane Shivsena)

मुंब्रा येथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस 144 कमल लागू करण्याची शक्यता आहे. कलम 144 नुसार मुंब्रा शाखेच्या आसपास 100 मीटर पर्यंत कोणालाही प्रवेश देणार नाही. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करण्यात येणार प्रवेशबंदी आहे.

(हेही वाचा – Former Naval Officers Qatar : माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची ‘ही’ कार्यवाही)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात बॅनर लावले होते. त्यातील ९० टक्के बॅनर फाडल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

“आज उद्धव ठाकरेंचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. लावलेले ९० टक्के बॅनर आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक बॅनर फाडायला किमान १५ मिनिट तरी लागतात आणि ‘सर्वत्र नजर असणाऱ्या’ पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, ‘उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!,’” असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. (Mumbra Thane Shivsena)

“असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशन आणि ठाणे पोलिसांचे आभार मानतो. ते ‘त्यांची ड्युटी’ मोठ्या निष्ठेने करत आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी पोलिसांवरही टीका केली आहे. ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो मंजुरे खुदा होता हैं..!,’” अशी शायरी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.