पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. ही चर्चा दिल्लीपासून ते राजस्थानच्या गल्लीमोहल्ल्यात सुरू आहे आणि महत्वाचे म्हणजे, नाराजीची चर्चा होण्यामागचे कारणही तसेच आहे. (Rahul Gandhi)
मध्यप्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुआधार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते कॉंग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यापर्यंत सर्व जण मैदानात उतरले आहेत. कुठे जंगी प्रचारसभा तर कुठे रोड शो. कुठे स्कुटर रॅली तर कुठे घरोघरी पदयात्रा. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे जे आवश्यक वाटत आहे ते सर्व राजकीय पक्षांकडून केले जात आहे. (Rahul Gandhi)
परंतु, कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये अद्याप एकही प्रचार रॅली का घेतली नाही? राहुल गांधी यांनी राजस्थानला वाऱ्यावर का सोडले आहे? असे कितीतरी प्रश्न चर्चेचा विषय झाले आहेत. कॉंग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर कमालिचे नाराज आहेत. का? सचिन पायलट यांना वारंवार साईड लाईन केले जात असल्यामुळे ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. (Rahul Gandhi)
(हेही वाचा – Sharad Pawar Ajit Pawar Meet : कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येवो; शरद पवार यांच्या दिवाळी शुभेच्छांमध्ये ‘त्या’ भेटीचा संदर्भ)
महत्वाचा मुद्या असा की, राजस्थानमध्ये १५ दिवसानंतर अर्थात येत्या २५ नोव्हेंबरला मतदान होणे आहे. मात्र, राहुल गांधी यांनी एकही रॅली राजस्थानमध्ये घेतली नाही. प्रियंका गांधी यांनी टोंक जिल्ह्यात एक आणि दौसा सिकराय येथे एक अशा दोन सभा घेतल्या आहेत. याशिवाय कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याही दोन प्रचार सभा झाल्या आहेत. त्यांनी बारा आणि जोधपूरमध्ये या सभा घेतल्या होत्या. दिवाळीनंतर राहुल गांधी सभा घेतील अशी आशा राजस्थानमधील कॉंग्रेसला आहे. (Rahul Gandhi)
महत्वाचे म्हणजे, राजस्थानमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीचा मुकाबला आहे. कदाचित म्हणूनच भाजपच्या प्रचाराची धुरा दस्तुरखुद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हाती घेतली आहे. तर कॉंग्रेसची धुरा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या हाती ठेवली आहे. राहुल गांधी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. मिझोरममध्ये मतदान झाले आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. निवडणुकीची घोषणा होऊनही बरेच दिवस लोटले आहेत. परंतु, राहुल गांधी यांनी राजस्थानपासून स्वत:ला लांब ठेवले आहे. यामुळे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबूज ऐकायला मिळत आहे. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community