मुंब्र्यात उद्धव ठाकरे येणार आहेत, त्याआधीच त्यांचा हा दौरा वादात सापडला आहे. ठाकरे आणि शिंदे गटात यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्सही फाडण्यात आले. हे बॅनर्स मुंब्रा आणि मुलुंड टोलनाक्याजवळ लावण्यात आले होते. त्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी, बॅनर फाडता, तुमची लायकी काय? अशी टीका केली, त्यावर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावर घणाघाती हल्ला केला.
काय म्हणाले नरेश म्हस्के?
संजय राऊत तुमची लायकी काय? हे महाराष्ट्राला माहित आहे. सिल्व्हर ओकच्या बाहेरील द्वारपाल. सिल्व्हर ओकचा पगारी नोकर ही त्यांची स्वत:ची लायकी आहे. बॅनर फाडण्याची आम्हाला गरज नाही. राज्यात जातीय दंगली घडवण्याचा जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांचा कट आहे. मुंब्र्याच्या शाखेमध्ये लोक आणण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी 500- 500 रुपये वाटलेले आहेत, संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत. संजय राऊत यांनी वर्षा बाहेर चाकरी करावी. मुख्यमंत्री शिंदे काही जाणार नाहीत. ते टर्म पूर्ण करणार, असे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नरेश म्हस्के म्हणाले. हेच मुळात अफजल खानाची औलाद आहेत. यांची काय लायकी आहे ते सांगा ना. आम्ही खरी शिवसेना आहोत. मुंब्रा शाखेवर आमचा दावा कायम राहणार, ती शाखा आनंद दिघे यांनी बांधली आहे. संजय राऊत यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांनी आयोध्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केली, एकनाथ शिंदे यांचे कान भरले, असेही शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नरेश म्हस्के म्हणाले.
Join Our WhatsApp Community