India – USA : भारत-अमेरिकेत मंत्रीस्तरीय ‘टू प्लस टू’ चर्चा

142
India - USA : भारत-अमेरिकेत मंत्रीस्तरीय 'टू प्लस टू' चर्चा

जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका (India – USA) यांच्यात शुक्रवारी (१० नोव्हेंबर) ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चा पार पडली. यावेळी इस्त्रायल-हमास संघर्षासोबतच भारताचा चीनसोबत असलेला वाद आणि कॅनडा सोबतच्या तणावावरही चर्चा झाल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘टू प्लस टू’ (India – USA) मंत्रिस्तरीय चर्चेत अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी केले. तर भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (India – USA) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी लिहिलेल्या ‘या’ गाण्याला मिळाले ग्रॅमी नामांकन)

भारताचे दहशतवादाविरुद्धचे धोरण शून्य सहिष्णुतेचे आहे

इस्त्रायल- गाझा संघर्ष, युद्धबंदी (India – USA) यावर क्वात्रा यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये मध्यपूर्वेतील परिस्थितीवर चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी आपापली मते मांडली गेली. आमची भूमिका स्पष्ट असून चर्चेदरम्यानही ही भूमिका मांडण्यात आली. दोन राज्यांचा तोडगा संवाद आणि शांततेवर आधारित असावा. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. (India – USA) भारताचे दहशतवादाविरुद्धचे धोरण शून्य सहिष्णुतेचे आहे. दुसरीकडे, भारतानेही मानवतावादी मदत पाठवली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.