- ऋजुता लुकतुके
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (SA vs Afg) सामन्यादरम्यान एक विचित्र प्रसंग घडला. आफ्रिकन तडाखेबाज फलंदाज क्विंटन डी कॉक विरुद्धचं पायचीतचं अपील मैदानातील पंचांनी फेटाळल्यावर अफगाण खेळाडूंनी तिसऱ्या पंचांकडे अपील केलं. आणि अखेर त्यांच्या बाजूने कौल मिळवलाही. पण, तोपर्यंत मैदानावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
१४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर महम्मद नाबीच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉक रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायला गेला. पण, तो पूर्णपणे चकला. आणि चेंडू त्याच्या पॅडवर येऊन आदळला. बघताना तरी हा प्लम म्हणये यष्टीच्या थेट समोर पाय असल्याचं दिसत होतं. म्हणजेच फलंदाज सरळ सरळ बाद असल्याचं दिसत होतं.
पण, मैदानावरील पंच ख्रिस ब्राऊन यांनी बाद दिलं नाही. आधी अफगाण फलंदाजांना अश्चर्याचा धक्का बसला. पण, लगेचच त्यांनी तिसऱ्या पंचांकडे अपील करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
अफगाणिस्तानसाठी हा बळी महत्त्वाचा होता. कारण, अहमदाबादच्या सोप्या खेळपट्टीवर त्यांनी २४५ धावा केल्या होत्या आणि ही धावसंख्या इतकी पुरेशी नव्हती. शिवाय क्विंटन डी कॉक या स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी फलंदाज आहे. त्याचा बळीही अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा होता.
(हेही वाचा Ravi Rana : अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीवर रवी राणांचा दावा; दिवाळीत मोठा बॉम्ब फुटले)
क्विंटन डी कॉकच्या आता या विश्वचषक स्पर्धेत ५९१ धावा झाल्या आहेत. शिवाय यष्टीमागे त्याने तब्बल १९ बळीही टिपले आहेत. अशी दुहेरी कामगिरी करून तो ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्त आणि पाकचा सर्फराज अहमद यांच्या पंक्तीत बसला आहे.
Join Our WhatsApp Community