World Pneumonia Day 2023 : जागतिक न्यूमोनिया दिन का साजरा केला जातो?

137
वर्ल्ड न्यूमोनिया डे (World Pneumonia Day) म्हणजेच जागतिक न्यूमोनिया दिन १२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात १२ नोव्हेम्बर २००९ रोजी ‘ग्लोबल कोलिशन अगेन्स्ट चाइल्ड न्यूमोनिया’ द्वारे करण्यात आली. जगभरातील न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नियंत्रित करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. याशिवाय त्यांच्या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा त्यांचा उद्देश होता जेणेकरून लोकांना न्यूमोनियाबद्दल जागरुकता करता येईल.

न्यूमोनिया म्हणजे काय?

न्यूमोनिया (World Pneumonia Day) हा एक प्रकारचा संसर्ग आहे ज्यामध्ये फुफ्फुसातील वायूच्या पिशव्या सुजतात. ज्यामध्ये पू भरलेला असतो. त्यामुळे कफ किंवा पू यासह खोकला, ताप, थंडी वाजते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी यांसारख्या जंतूंमुळे अनेकदा न्यूमोनिया होऊ शकतो. ही समस्या लहान मुलांसाठी आणि ६५ वर्षांवरील लोकांसाठी तसे प्रतिकारशक्ती अगदीच कमी असलेल्या लोकांसाठी खूप धोकादायक ठरु शकते.

न्यूमोनियापासून सर्वात जास्त धोका कोणाला आहे?

तसं पाहता कोणालाही न्यूमोनिया होऊ शकतो. पण काही परिस्थितींच्या हा धोका वाढू शकतो. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल झालेला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तर त्याला न्यूमोनिया (World Pneumonia Day) होण्याचा धोका असू शकतो. याशिवाय दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी रोग  किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्येही न्यूमोनियाचा धोका जास्त असतो. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर न्यूमोनियापासून शरीराचे संरक्षण करणार्‍या क्षमतेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

या दिनाचा हेतू काय आहे?

जागतिक न्यूमोनिया दिनाचे (World Pneumonia Day) मुख्य उद्दिष्ट म्हणजे न्यूमोनियाची कारणे, लक्षणे आणि उपचारांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत, विशेषतः गरीबांपर्यंत पोहोचणे होय. या कृतीद्वारे जगभरातील लाखो मुलांचा जीव न्यूमोनियापासून वाचवला जाऊ शकतो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ५ वर्षांखालील मुलांचे योग्य लसीकरण करणे जेणेकरून मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल.

न्यूमोनियाची लक्षणे काय आहेत?

श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे, जास्त कफ होऊन खोकला येणे, थकवा, ताप, घाम येणे आणि अंग थरथरणे तसेच मळमळ होणे, उलट्या किंवा अतिसार असा त्रास होणे ही न्यूमोनियाची लक्षणे आहेत.

तुम्ही काय करु शकता?

अनेक देश आणि १०० हून अधिक संस्था या मोहिमेचे यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून तुम्हाला किंवा कुणालाही लक्षणे दिसल्यास लगेच निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तसेच हा लेख शेअर करुन जनजागृती करु शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.