Mahada Lottery : घराचा ताबाही आता ऑनलाइन

170

मुंबई गृहनिर्माण मंडळाने यंदा चार हजार ८२ घरांसाठी काढलेली सोडत पूर्णत: ॲानलाइन होती. ऑनलाईन सोडतीतील यशस्वी पात्र अर्जदारांना घराचे ताबापत्र देण्यास सुरुवात केली आहे.१०० टक्के विक्री किंमत, मुद्रांक शुल्क भरून दस्तावेज नोंदणी करणाऱ्या १५० अर्जदारांना आतापर्यंत ताबापत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे विजेत्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर घरप्रवेशाची शक्यता निर्माण झाली आहे. (Mahada Lottery)

घराची संपूर्ण विक्री किंमत, मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच देखभाल खर्च भरलेल्या अर्जदारांना ॲानलाइन ताबा पत्र देण्यात येत असल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे उप मुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. या विजेत्यांना फक्त घराची चावी घेण्यासाठी म्हाडा कार्यालयात यावे लागत असून तेथेही विलंब होऊ नये यासाठी सर्व प्रक्रिया ॲानलाइन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विजेत्यांना लगेच नव्या घराची चावी मिळत असल्यामुळे त्यांना दिवाळीतच नव्या घरात प्रवेश करणे शक्य झाले आहे.

(हेही वाचा : Diwali 2023 : आता बिनधास्त खा दिवाळी फराळ!)

यंदा पहिल्यांदाच नव्या प्रणालीनुसार अर्ज नोंदणी व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी झाले. मंडळातर्फे सोडतीनंतरही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्याने विजेत्यांना प्रथम सूचना पत्र, तात्पुरते देकार पत्र, २५ टक्के विक्री किमतीचा भरणा करण्याचे पत्र, ७५ टक्के रक्कम गृह कर्जामार्फत उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, वितरण आदेश, ताबा पत्र आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रक्रियेत सर्व पत्रे संबंधित विजेत्यांना अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीने जात आहेत. यामुळे बनावट, खोटी कागदपत्रे बनविणाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा केल जात आहे. या सर्व पत्रांवर क्युआर कोड टाकण्यात आला असून त्यामुळे कागदपत्रांची सत्यता तपासणे शक्य झाले आहे. या सोडतीतील ५५० विजेत्यांनी सदनिकेच्या संपूर्ण विक्री किंमतीचा भरणा केला आहे. मात्र दीडशे विजेत्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष ताबा देण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.