आज म्हणजेच रविवार १२ नोव्हेंबर रोजी भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध (India vs Netherlands) खेळणार आहे. सध्या सुरू असलेल्या 2023 च्या विश्वचषकातील एकमेव अपराजित संघ म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. आठपैकी आठ सामने जिंकून आणि आतापर्यंत एकूण 16 गुण मिळवून साखळी फेरीतील सर्वोत्तम संघ म्हणून रोहित शर्मा अँड कंपनीचा उल्लेख केला जात आहे.
हा सामना आज दुपारी २ वाजता (India vs Netherlands) बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
(हेही वाचा – Ind vs NZ Semi Final? भारत विरुद्ध न्यूझीलंड संभाव्य उपान्त्य फेरीच्या शक्यतेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस )
विश्वचषक 2023 मधील शेवटचा लीग सामना
आजचा सामना नेदरलँड्ससाठी (India vs Netherlands) महत्त्वाचा असणार आहे. कारण नेदरलँड संघाकडे 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचा हा शेवटचा मार्ग उरला आहे. हा सामना जिंकल्यास नेदरलँड्स बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मागे टाकू शकतो.
प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार?
भारतीय संघ (India vs Netherlands) उपांत्य फेरीपूर्वी कोणताही धोरणात्मक प्रयोग करणार नसल्याचं, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. पण, या सामन्याकडे उपांत्य फेरीचा सराव सामना म्हणून पाहिल्यास काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.. टीम इंडिया आज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देऊ शकते आणि प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – Ind vs Ned : विराट कोहलीचा आखूड टप्प्याचे चेंडू आणि डावखुऱ्या फिरकीचा सराव)
अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/आर अश्विन, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. (India vs Netherlands)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community