Diwali 2023 : दिवाळीत ओढ लागली गावाकडची; गर्दीने बस आणि रेल्वेस्थानके फुल्ल

187

अनेकांना शनिवारपासूनच (११ नोव्हेंबर) दिवाळीच्या (Diwali 2023) सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच सध्या दिवाळीसाठी गावाला जाण्याची घाईगर्दी सुरू झाली असून, मिळेल त्या वाहनाने गावचे घर गाठण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. त्यामुळे रेल्वे आणि बसस्थानके गर्दीने फुल्ल झाली आहेत.

आता पुढील चार दिवस सुट्टीचे (Diwali 2023) असून गावी घर असणाऱ्या चाकरमान्यांना गावची ओढ लागली आहे. काहींनी आधीच रेल्वे- बसचे आरक्षण करून ठेवले आहे. तर ज्यांना ऐनवेळी सुटी मंजूर झाली, त्यांची मात्र तारांबळ उडाली. त्यांचा सर्व भर होता तत्काळच्या तिकिटावर.

(हेही वाचा – High Court order : रात्री १२ नंतरही फटाके फ़ुटलेच)

तिकीट वा आरक्षण मिळेल की नाही, याची खात्री नसतानाही अनेकांनी गावी (Diwali 2023) जाण्यासाठी स्थानकांवर गर्दी केली होती. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, वांद्रे आदी रेल्वेस्थानकांत तर मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला बसस्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होती.

दरम्यान शुक्रवारी (१० नोव्हेंबर) एका दिवसात एसटीने २७ कोटी ६२ लाख कमावले आहेत. तर गेल्या दहा दिवसांत दिवाळी हंगामात एसटी महामंडळाला सुमारे २०० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मध्य रेल्वेच्या (Diwali 2023) ५०० विशेष गाड्या दिवाळी, छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊ मध्य रेल्वेतर्फे यंदा ५०० उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Weather Update : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस)

त्यामुळे या विशेष गाड्यांद्वारे (Diwali 2023) सुमारे साडेसात लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती आणि कोल्हापूरसाठी चालविण्यात येत आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून ४०० गाड्या चालवण्यात येणार आहेत.

रेल्वेस्थानकात प्रवाशांची (Diwali 2023) वाढती गर्दी पाहता जास्ती जास्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आरपीएफ, जीआरपी जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच गाड्यांची तपासणी केली जात आहे. अधिकाऱ्यांचे २४ तास स्थानकावर लक्ष आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.