Central Railway : मध्य रेल्वेची दलालांवर कारवाई, २६९ गुन्हे नोंद, ३१७ जणांना अटक

105

मध्य रेल्वेच्या (Central Railway) रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सामना करण्यासाठी आणि बोनाफाईड प्रवाशांचे हित जपण्यासाठीची मोहीम तीव्र केली आहे. सायबर सेलकडून मिळालेल्या डेटा आणि इतर इनपुटच्या आधारे मध्य रेल्वेचे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात हे छापे टाकण्यात आले.

चालू वर्षात एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत (Central Railway) दलालीच्या २६९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत ३१७ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत ३.४२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – High Court order : रात्री १२ नंतरही फटाके फ़ुटलेच)

या २६९ प्रकरणांपैकी (Central Railway) एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू वर्षात एकट्या मुंबई विभागात दलालीचे ९७ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत ११७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात ७२ गुन्हे दाखल झाले असून ७७ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे विभागातील आरपीएफने ५६ गुन्हे दाखल करून ७४ जणांना अटक केली, नागपूर विभागात ३६ गुन्ह्यांसह ४१ जणांना अटक, सोलापूर विभागात ८ गुन्हे दाखल करून ८ जणांना अटक करण्यात आली. (Central Railway)

(हेही वाचा – Rto Action : मुंबई प्रदूषण करणाऱ्या ८१ वाहनांवर कारवाई)

मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह (Central Railway) प्रवास करण्याचे आवाहन केले आहे आणि ऑनलाइन ई-तिकीटिंगमध्ये गुंतलेल्या दलालांकडून तिकीट खरेदी न करण्याचे देखील आवाहन केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.