Devendra Fadnavis : “काँग्रेसचा केवळ हिंदुत्वाला विरोध नाही, तर…” ; फडणवीसांची सडकून टीका

175
Devendra Fadnavis : मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आश्वासन
Devendra Fadnavis : मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आश्वासन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशमधील बुऱ्हानपूर आणि इंदूर येथी निवडणूक प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली.

“काँग्रेसचा केवळ राम मंदिराला नाही, तर रामालाही विरोध आहे. तसेच त्यांचा केवळ हिंदुत्वाला विरोध नाही, तर हिंदू या शब्दालाही विरोध आहे. असे काँग्रेसच्याच आचार्य प्रमोद यांनी सांगितले आहे.” अशा शब्दांमध्ये फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली.

(हेही वाचा – Deepak Kesarkar : लोकसभा नाही विधानसभा लढणार)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“छत्तीसगड, राजस्थानमध्ये दिलेली कोणते आश्वासन पूर्ण केले, हा प्रश्न काँग्रेस नेत्यांना विचारला पाहिजे. निवडून आल्यावर जनतेला दिलेली वचने ते विसरून जातात आणि केवळ स्वत:चा परिवार आठवतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशालाच आपला परिवार मानतात.” (Devendra Fadnavis)

पुढे बोलतांना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “गेल्या ६० वर्षांत नागरिकांना घरे मिळाली नाहीत. पण मोदी यांनी गरीब कल्याणाचा मोठा कार्यक्रम राबवीत असून युनोनेही त्याचे कौतुक केले. मोदी सरकारने कोटय़वधी नागरिकांना विविध योजनांचे लाभ दिले. जात, धर्म, भाषा, पंथ न पाहता सर्वाना मदत दिली. तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे भारत वाटचाल करतोय, हे मोदींचे मोठे यश आहे.”

(हेही वाचा – Supriya Sule : अजित दादा सुप्रिया ताईंना काय भेट देणार, तर त्यांनीही स्पष्टच सांगितले)

त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवून भाजपला संपूर्ण बहुमताने निवडून द्यावे. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर तापी पुनर्भरण योजना तडीस जाईल आणि दोन्ही राज्यांना लाभ होईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

या सभेवेळी खासदार ज्ञानेश्वर पाटील, भाजप उमेदवार अर्चना चिटणीस, गोलु शुक्ला, खासदार उन्मेश पाटील, महापौर माधुरी पटेल आणि अन्य नेते उपस्थित होते. (Devendra Fadnavis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.