Uttarkashi Tunnel Accident : बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला, पन्नासहून अधिक मजूर अडकल्याची भीती

तब्बल ५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे.

133
Uttarkashi Tunnel Accident : बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला, पन्नासहून अधिक मजूर अडकल्याची भीती
Uttarkashi Tunnel Accident : बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला, पन्नासहून अधिक मजूर अडकल्याची भीती

 उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे.उत्तरकाशी जिल्ह्यात शनिवारी(११ नोव्हेंबर) रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. या घटनेची मााहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.तर या ढिगाऱ्याखाली ५०-६० मजूर अडकल्याची माहिती समोर येत आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

या बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा तब्बल ५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, प्रशासनाने या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली आहे. भूस्खलनामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. बोगद्याचा डेब्रिज हटवण्याचं काम सुरू आहे. तसेच उभ्या ड्रिलिंग मशीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

(हेही वाचा : Devendra Fadnavis : “काँग्रेसचा केवळ हिंदुत्वाला विरोध नाही, तर…” ; फडणवीसांची सडकून टीका)

या पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि इमारती, रस्ते आणि महामार्गांचे नुकसान झाले होते.या वर्षी ऑगस्टमध्ये, शिवपुरी भागातील पुराच्या प्रवाहाच्या पाण्याने भरलेल्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लाईन प्रकल्पाच्या ‘एडिट-II’ नावाच्या बोगद्यात सुमारे ११४ कामगार अडकले होते. मात्र, पोलिसांच्या पथकाने पाणी बाहेर काढले आणि दोरीच्या सहाय्याने सर्व ११४ कामगारांची सुटका केली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.